पार्लेत अपंगांना ग्रामपंचायतीचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:48 AM2021-04-30T04:48:43+5:302021-04-30T04:48:43+5:30
उपसरपंच मोहन पवार, सदस्य अविनाश नलवडे, शुभांगी नलवडे, नंदिनी निकम, मनीषा नलवडे, प्रवीण गुरव, सुभाष नलवडे, ग्रामसेवक मदन बेंद्रे ...
उपसरपंच मोहन पवार, सदस्य अविनाश नलवडे, शुभांगी नलवडे, नंदिनी निकम, मनीषा नलवडे, प्रवीण गुरव, सुभाष नलवडे, ग्रामसेवक मदन बेंद्रे व लाभार्थी उपस्थित होते. ग्रामपंचायत करापोटी मिळालेल्या उत्पन्नातून पाच टक्के अनुदान हे अपंगांसाठी राखीव ठेवण्यात येते. यावर्षीही याचे वाटप करण्यात आले. गतवर्षी ग्रामपंचायतीला मिळालेल्या उत्पन्नातून पाच टक्के अनुदानातून एका लाभार्थ्याला केवळ साडेसातशे रुपयेच अनुदान देता येत होते. परंतु, कोरोना महामारीमुळे होणाऱ्या लॉकडाऊन काळात चांगले लोकही आज आर्थिक विवंचनेत आहेत. समाजातील प्रत्येक घटक या परिस्थितीचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत नियतीने ज्यांना आयुष्यभर अपंगत्व दिले आहे, अशा लोकांना सहानुभूती मिळावी आणि जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य मिळावे या विचारातून त्यांना मिळणाऱ्या पाच टक्के निधीवर ३५ टक्के जास्त निधी खर्च करून प्रत्येकी एक हजार रुपये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जास्तीचे अनुदान देण्यात आले. अपंग व्यक्तींच्या संवेदना जाणून त्यांना देण्यात आलेल्या अधिक रकमेमुळे लॉकडाऊन काळात केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
फोटो : २९केआरडी०२
कॅप्शन : पार्ले, ता. कऱ्हाड येथे पाच टक्के अनुदानातून अपंगांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. सरपंच आश्विनी मदने, उपसरपंच मोहन पवार, अविनाश नलवडे, ग्रामसेवक मदन बेंद्रे आदी उपस्थित होते.