जनता बँकेच्या निर्णयामुळे कर्जदारांच्या नातेवाइकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:39+5:302021-01-25T04:39:39+5:30

सातारा : सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची आणि सभासदांचे हित जोपासणारी असा नावलौकिक असलेल्या जनता सहकारी बँकेने २०१८ मध्ये घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे ...

Relief to the relatives of the borrowers due to the decision of Janata Bank | जनता बँकेच्या निर्णयामुळे कर्जदारांच्या नातेवाइकांना दिलासा

जनता बँकेच्या निर्णयामुळे कर्जदारांच्या नातेवाइकांना दिलासा

Next

सातारा : सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची आणि सभासदांचे हित जोपासणारी असा नावलौकिक असलेल्या जनता सहकारी बँकेने २०१८ मध्ये घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे कर्जदारांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे.

बँकेने एलआयसी ऑफ इंडियाबरोबर करार करून सभासद कर्जदारांसाठी लाईफ कव्हर विमा योजना स्वीकारलेली आहे. यामध्ये बँकेच्या सभासदांना मंजूर कर्ज रक्कम अदा करतेवेळी संपूर्ण कर्ज रकमेचा लाईफ कव्हर विमा काढण्यात येतो. त्यामुळे भविष्यात कर्जदारांबाबत दुर्दैवाने काही घडल्यास संबंधित सभासद कर्जदारांच्या वारसास संपूर्ण कर्ज रकमेची येणे बाकी असलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते.

या योजनेंतर्गत बँकेच्या वाई शाखेतील मृत सभासद कर्जदार कै. महादेव तुकाराम मांढरे यांच्या वारस नंदा महादेव मांढरे यांना अडीच लाख रुपये, मंगळवार पेठ शाखेतील सभासद कर्जदार कै. सागवेकर यांच्या वारस शीतल सागवेकर यांना पन्नास हजार रुपये, पोवई नाका शाखेतील सभासद कर्जदार कै. गोरखनाथ विठ्ठल काटे यांच्या वारस प्रमिला गोरखनाथ काटे यांना पन्नास हजार रुपये रक्कम लाईफ कव्हर विमा योजनेद्वारे देण्यात आली.

या रकमेचे धनादेश बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक जयवंतराव भोसले यांच्या हस्ते अदा करण्यात आले. यावेळी बँकेचे भागधारक पॅनेलचे प्रमुख आणि संचालक विनोद कुलकर्णी, चेअरमन अतुल जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, उपव्यवस्थापक मच्छिंद्र जगदाळे, सेवक संचालक अनिल जठार उपस्थित होते. (वा.प्र.)

२४ जनता

कर्जदारांच्या वारसांना लाईफ कव्हर विमा योजनेचे धनादेश प्रदान करताना संचालक जयवंत भोसले, भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी, बँकेचे अध्यक्ष अतुल जाधव आणि मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Relief to the relatives of the borrowers due to the decision of Janata Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.