कऱ्हाडात संक्रमण मंदावल्याने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:22+5:302021-09-27T04:42:22+5:30
पालिका आणि नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गत दीड वर्ष उपाययोजना करण्यात येत आहेत. पहिल्या लाटेत २२ ...
पालिका आणि नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गत दीड वर्ष उपाययोजना करण्यात येत आहेत. पहिल्या लाटेत २२ मे २०२० रोजी शहर कोरोनामुक्त झाले होते. त्यावेळी रुग्णसंख्या कमी होती. मात्र, त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर २०२० मध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढली होती. त्यावेळी जिल्ह्यात क-हाड शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले होते. पालिकेने अथक परिश्रम घेऊन शहरातील संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले होते. मार्च २०२१ पासून दुसरी लाट सातारा जिल्ह्यात सुरू झाली. मात्र, दुस-या लाटेत सातारा हा प्रथम क्रमांकाचा ‘हॉटस्पॉट’ झाला. जिल्ह्याची सर्वाधिक रुग्णसंख्या व मृत्युसंख्या साता-यात नोंदली गेली. आता लाट ओसरत असताना साता-यात रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे.
दरम्यानच्या काळात क-हाड तालुक्यातही रुग्णवाढ झाली होती. मात्र, महिनाभरात ती आटोक्यात आली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांत क-हाड शहर व तालुक्यात नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. गत आठवड्यात शहरात केवळ एकच रुग्ण ॲक्टिव्ह होता. या रुग्णास दोन दिवसांपूर्वी घरी सोडण्यात आले. त्यामुळे क-हाड शहर कोरोनामुक्त झाले आहे.
- चौकट
आजअखेर ७ हजार ३७९ रुग्णसंख्या
क-हाड शहरात आजअखेर एकूण ७ हजार ३७९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या एकही रुग्ण ॲक्टिव्ह नाही. तर आजअखेर १४१ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संभाव्य तिस-या लाटेपूर्वी शहरात जास्तीतजास्त लसीकरण करण्यासाठी पालिका व नागरी आरोग्य केंद्रे प्रयत्न करीत आहे.