remdesivir Crime-हिंगणगावामध्येही झाली होती रेमडेसिविरची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:51 PM2021-05-12T16:51:01+5:302021-05-12T16:52:48+5:30
CoronaVirus Satara : रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजारप्रकरणी अटकेत असलेल्या टोळीकडून फलटण तालुक्यात या अगोदरही इंजेक्शनची विक्री केल्याचे समोर आले आहे. फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे काही इंजेक्शन विकली होती. त्यातील दोन इंजेक्शन सध्या पोलिसांकडे जमा आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.
फलटण : रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजारप्रकरणी अटकेत असलेल्या टोळीकडून फलटण तालुक्यात या अगोदरही इंजेक्शनची विक्री केल्याचे समोर आले आहे. फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे काही इंजेक्शन विकली होती. त्यातील दोन इंजेक्शन सध्या पोलिसांकडे जमा आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.
फलटण शहर पोलिसांनी वृत्तपत्रामध्ये या गुन्ह्याच्या तपासकामी, कोणाची काही तक्रार असल्यास संपर्क करावा, त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन केले होते. केलेल्या आवाहनानुसार हिंगणगाव (ता. फलटण) येथील एक साक्षीदारांनी गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीकडून स्वतःचे नातेवाईक कोरोनाग्रस्त व उपचार घेत असताना मोठ्या किमतीने रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केली होती. परंतु, संबंधित रुग्णाचे उपचारादरम्यान निधन झाल्याने, शिल्लक राहिलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या दोन बाटल्या या तपासकामी त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर केलेल्या आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती फलटण पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी तातडीने सापळा रचून संबंधित सुविधा हॉस्पिटलचा कंपाउंडर सुनील कचरे (वय ३८), अजय सुरेश फडतरे (३४, व्यवसाय शेती, रा. पिंप्रद, ता. फलटण), प्रवीण दिलीप सापते (३६, रा. घाडगेवाडी, ता. फलटण) आरोपी निखिल अनिल घाडगे (३१, रा. अनपटवाडी, ता. खटाव) यांना गुन्ह्याच्या कामी अटक केली आहे.
अधिक चौकशी करता, चौकशीमध्ये आरोपी अमित विजय कुलकर्णी (वय ४५, रा. ७० बी /३, आदर्श कॉलनी, गोडोली, सातारा), रवींद्र रामचंद्र लाहोटी (वय ३२, रा. तारळे, ता. पाटण), मानसी मेडिकल तारळेचे मालक अरुण शामराव जाधव यांना अटक करण्यात आली असून, सध्या पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ व पथक हे करीत आहेत.