बावडेकर दुकानातून 'इंद्रजाल'ची अवशेष विक्री, वनविभागाच्या विशेष तपासणी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 12:47 PM2022-01-29T12:47:29+5:302022-01-29T12:49:24+5:30

हे अवशेष अचल हांजे यांच्याकडूनच इतरांना पुरविले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वन विभागाचे विशेष तपासणी पथक आता हांजेच्या पुरवठादाराचा शोध घेणार आहे.

Remains of magical wildlife were found in Bawdekar shops selling Ayurvedic medicine | बावडेकर दुकानातून 'इंद्रजाल'ची अवशेष विक्री, वनविभागाच्या विशेष तपासणी पथकाची कारवाई

बावडेकर दुकानातून 'इंद्रजाल'ची अवशेष विक्री, वनविभागाच्या विशेष तपासणी पथकाची कारवाई

googlenewsNext

सातारा : आयुर्वेदिक औषध विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये इंद्रजाल वन्यप्राण्यांचे अवशेष आढळून आले होते. हे अवशेष अचल हांजे यांच्याकडूनच इतरांना पुरविले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वन विभागाचे विशेष तपासणी पथक आता हांजेच्या पुरवठादाराचा शोध घेणार आहे. दरम्यान, कोल्हापुरात या पथकाने तपासणी करून हांजे याला चौकशीसाठी कऱ्हाडला बोलावले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, काही महिन्यांपूर्वी सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील काही दुकानांमध्ये वन्यप्राण्यांचे अवशेष आढळले. हे अवशेष वन विभागाने जप्त केल्यानंतर त्याचा पुरवठा कोल्हापूर येथील आयुर्वेदिक औषध विक्री करणारे बावडेकर यांनी केल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने बावडेकर दुकानाची झडती घेतली तेव्हा वन्यप्राण्यांचे अवशेष आढळून आल्याने खळबळ माजली होती. त्यानंतर वन विभागाने बावडेकर यांची दुकाने काही महिने बंद करण्याचे आदेश दिले होते.

सातारा, सांगली आणि कोल्हापूर, अशा तिन्ही जिल्ह्यांमध्ये या कारवाईची व्याप्ती असल्यामुळे वन विभागाच्या स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमची स्थापना करण्यात आली. या टीमचे प्रमुख साताऱ्याचे उपवनसरंक्षक महादेव मोहिते आहेत. यात कोल्हापूरचे वन्यजीवचे विभागाीय वनअधिकारी विशाल माळी, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले, सहायक वनसंरक्षक अजित साजणे यांचा समावेश आहे.

याच पथकातील सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे गुरुवारी कोल्हापुरात अचल हांजे याच्या चौकशीसाठी कोल्हापुरात गेले होते. येथे हांजेची कसून चौकशी केल्यानंतर पुढील अधिक तपासासाठी सोमवार, दि.३१ जानेवारीला कऱ्हाड येथे बोलविण्यात आले आहे.

‘एसआयटी’ जाणार याच्या मुळाशी

समुद्री जीव असणारे इंद्रजाल अचल हांजे यानेच आपल्याला पुरविल्याचे ताब्यात असलेल्या एका आरोपीने पथकाला सांगितले. त्यामुळे हांजे याच्या चौकशीतून एसआयटी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार, हे स्पष्ट झाले आहे. समुद्रातून हा जीव काढण्यापासून तो कोणत्या मार्गे कुठे-कुठे पोहोचवला गेला याचा तपास करण्यात येणार आहे.

इंद्रजाल प्रकरणाची साताऱ्यासह सांगली आणि कोल्हापूरमध्येही व्याप्ती आहे. हा तपास गतीने व्हावा, यासाठी समांतर तपास यंत्रणा सुरू ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी अचल हांजेची चौकशी सोमवारी करण्यात येणार आहे. -महादेव मोहिते, उपवनसंरक्षक

Web Title: Remains of magical wildlife were found in Bawdekar shops selling Ayurvedic medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.