रेमडेसिविर इंजेक्शनचे प्रशासनाच्या आदेशानुसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:39 AM2021-04-24T04:39:52+5:302021-04-24T04:39:52+5:30
सातारा : रेमडेसिविर इंजेक्शनच्या साठ्याची अन्न व औषध प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्या वितरण आदेशानुसारच विक्री व वितरण करावे. परवानगीखेरीज ...
सातारा : रेमडेसिविर इंजेक्शनच्या साठ्याची अन्न व औषध प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्या वितरण आदेशानुसारच विक्री व वितरण करावे. परवानगीखेरीज कोणतेही परस्पर विक्री व वितरण करण्यात येऊ नये, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात वाढत्या कोविड रुग्णसंख्येचा विचार करता जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनची टंचाई भासत असून, रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी दैनंदिन वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येनुसार इंजेक्शनचा साठा, मागणी विचारात घेता विविध पातळीवर उपाययोजनेसह तरतूद करणे अत्यंत आवश्यकता आहे.
सेवा बजावण्याच्या अनुषंगाने केलेल्या निष्काळजीपणाबद्दल हॉस्पिटल व मेडिकल लायसेन्स - परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल असेही कळविले आहे.