नवीन भाजीमंडई समोरची खोकी काढा !--आता कामाचं बोला

By admin | Published: October 23, 2014 09:03 PM2014-10-23T21:03:49+5:302014-10-23T22:49:49+5:30

छत्रपती शिवाजी भाजी मंडई : पालिका प्रशासन हतबल --निवडणूक झाली,

Remove the box next to the new vegetable! - Now talk about work | नवीन भाजीमंडई समोरची खोकी काढा !--आता कामाचं बोला

नवीन भाजीमंडई समोरची खोकी काढा !--आता कामाचं बोला

Next

कऱ्हाड : येथील पालिकेने पाच वर्षांपूर्वी बांधलेली छत्रपती शिवाजी भाजी मंडई रडतखडत सुरू झाली़ किरकोळ भाजी विक्रेत्यांना कट्टे वाटप केलेत खरे; पण कट्टे कमी अन् विक्रेते जास्त असल्याने मंडई बाहेर रस्त्याच्या दुर्तफाचे विक्रेते जास्त पाहायला मिळताहेत़ तर मंडईच्या बाहेरच्या बाजूने असलेले दुकानगाळे समोर असणाऱ्या खोक्यांमुळे लिलाव घेऊनही बंद आहेत़
पालिकेच्या नवीन भाजी मंडईत व्यापारी अन् पालिका प्रशासन यांच्यात मेळ बसत नसल्याने काम पूर्ण होऊनही कट्टे वर्षभर रिकामेच होते़
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी आतील कट्ट्यांचे वाटप करण्यात आले; पण कट्टे कमी अन् विके्रते जास्त अशी अवस्था असल्याने पुन्हा वाद होऊ लागला़ अखेर चिठ्ठ्या टाकून कट्टे वाटले; पण दुप्पट विक्रेते मंडईबाहेर रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्री केली जात असल्याने नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतोय़ (प्रतिनिधी)

दोन वर्षांपूर्वी आम्ही बोली बोलून दुकान गाळे घेतलेत़ त्यावेळी समोरची खोकी काढून देतो, असे पालिका प्रशासनाने सांगितले; पण आजूनही खोकी हटविली नसल्याने आमची अडचण झाली आहे़
- उस्मान मुल्ला, राजू कदम, व्यावसायिक

भाजी मंडईतील २५ ते ३० दुकानगाळेधारकांचा प्रश्न खोक्यांमुळे अडून पडला आहे़ तो मार्गी लावण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न केले होते़ आता पुन्हा नव्याने प्रयत्न करून खोकी हलविण्यात येतील़

- जयवंत पाटील
माजी नगराध्यक्ष

Web Title: Remove the box next to the new vegetable! - Now talk about work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.