स्वत:साठी वेळ काढल्यास मस्त जगता येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:02 AM2018-07-30T01:02:39+5:302018-07-30T01:02:43+5:30

Removing yourself for yourself can be a great way | स्वत:साठी वेळ काढल्यास मस्त जगता येईल

स्वत:साठी वेळ काढल्यास मस्त जगता येईल

Next
<p>प्रगती जाधव-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : घर, मुलांची जबाबदारी, पै-पाहुणे यांच्यासह नोकरी सांभाळण्याची कसरत करणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अवघ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाºया महिलांचे स्वत:च्याच आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. महिलांनी दिवसभरात स्वत:साठी खास वेळ काढला तर व्यस्त राहूनही त्यांना मस्त जगता येईल, असे जाणकार सांगतात.
महानगरांच्या तुलनेत सातारा शहराचा विस्तार मर्यादित आहे. त्यामुळे राहण्याचं ठिकाण, मुलांची शाळा, दवाखाने, मंडई आणि नोकरीची ठिकाणं ही अगदी पाच किलोमीटरच्या आतील परिघातच येतात; पण घराबरोबरच नोकरीच्या ठिकाणचा ताण, घरी आल्यानंतर गृहकर्तव्याची येणारी जबाबदारी यामुळे साताºयातील महिलाही मानसिक आणि शारीरिक ताणाखाली असल्याचे जाणवत आहे.
वाढत जाणारे वजन, दुखणारे गुडघे, पित्ताचा त्रास, कंबरदुखी, पाळीचा त्रास, कमी हिमोग्लोबीन, दम लागणे, टाचा प्रचंड दुखणे, रात्री झोप न येणे, अनामिक दडपण जाणवणे, केस गळणे, भेगा पडणे, त्वचा कोरडी होत जाणे या आणि अशा अनेक समस्या सध्या घराघरांमधील महिलांमध्ये दिसत आहेत.
या तक्रारींपासून लांब जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते; पण खरंच यासाठी वेळ कुठून आणायचा? असा प्रश्न महिलांना पडतो. पण आजीबार्इंच्या बटव्यातून एकेक आयडिया काढल्या तर कौटुंबिक जबाबदाºयांबरोबरच त्या स्वत:ही आरोग्यदायी राहू शकतात हे नक्की. यासाठी महिलांनी स्वत:च्या आरोग्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तरच कुटुंबाकडे लक्ष देऊ
शकतात.
रोजच्या रोज दूध आवश्यकच..
आपल्या नेहमीच्या धावपळीत जर स्वत:मधील निरोगीपण टिकलं तर आणि तरच या सर्व जबाबदाºया महिलांना पार पाडता येतील. पाव किलो खारीक पावडर, पन्नास ग्रॅम खायचा डिंक एकत्र करून हे मिश्रण २ चमचे दुधात मिक्स करून आपल्यासाठी रोज सकाळी खाण्यासाठी तयार करता येईल. यामुळे हाडांना बळकटी मिळेल. दोनवेळा शतावरी कल्प दुधातून घेऊनही दिवसभराची ऊर्जा टिकवता येईल.

देशी नाष्ट्याची गरज..
हे घ्याच : नाश्ता सक्तीच्या प्रकारात घेऊन त्यासाठी मेतकूट भात, तूप साखर पोळी, लोणी-साखर पोळी, राजगिरा लाही व दूध, लाह्यांचे पीठ व ताक, नाचणी पेज किंवा खीर,भाकरी भाजी, पुलाव, थालीपीठ, उपमा, शेवई उपमा यासारखा अस्सल देशी मेन्यू नक्की करायचा.
हे टाळाच : सकाळच्या नाष्ट्यासाठी ओट्स, कॉर्नफ्लेक्स, बाटलीबंद पेय, बेकरी पदार्थ, शिळे पदार्थ, मॅगी या पदार्थांवर ठामपणे बंदीच हवी.
हेही पाहावे करून
फोडणी करतांना हिंग, मेथी दाणे, हळद, कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापरले तर यामुळे हाडांचे विकार आणि पाळीचा त्रास दूर होतो.
एक वेळेच्या जेवणात वरण, भात, तूप, लिंबू आणि लोखंडी कढईत भाजी पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम
ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की पचनाच्या तक्रारी चक्क गायब
कणकेत चिमूटभर चुना मिक्स करणं आणि रोजच्या आहारात कडीपत्ता चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, शेवगा भरपूर वापर केला तर हाडांना बळकट ठेवता येईल.

सकाळी थोडासा वेळ दीर्घ श्वसनासाठी देऊन फुप्फुस आणि पोटांच्या स्नायूंचा व्यायाम सहजच होईल. सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी जेवणाआधी २ तास.
दिवसभर वापरायची चप्पल ही चामड्याची घेऊन रोज त्यावर एरंड तेलाचा कापसाचा बोळा फिरवून ती चप्पल दिवसभर वापरून टाचदुखीला कायमचा निरोप
स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी मनमोकळ्या गप्पा मारणाºया मित्र-मैत्रिणी शोधून खूप हसा.
आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांना, मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या आवडीला या निमित्ताने वर काढा.
सोशल मीडियापेक्षा गाठी भेटींवर भर द्या.

Web Title: Removing yourself for yourself can be a great way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.