लॉकडाऊनमध्ये साडेसातशे गाड्यांची दुरुस्ती पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:41 AM2021-08-23T04:41:40+5:302021-08-23T04:41:40+5:30

सातारा : नोकरीसाठी मुलाखत, महत्त्वाची मुलाखत किंवा पाहुण्यांकडे चांगले कपडे घालून जायचे अन् रस्त्यात पाऊस गाठतो. भलेही एसटीतून प्रवास ...

Repair of seven and a half hundred vehicles completed in lockdown | लॉकडाऊनमध्ये साडेसातशे गाड्यांची दुरुस्ती पूर्ण

लॉकडाऊनमध्ये साडेसातशे गाड्यांची दुरुस्ती पूर्ण

Next

सातारा : नोकरीसाठी मुलाखत, महत्त्वाची मुलाखत किंवा पाहुण्यांकडे चांगले कपडे घालून जायचे अन् रस्त्यात पाऊस गाठतो. भलेही एसटीतून प्रवास सुरू असला तरी एसटीच्या छतातून पावसाचा थेंब टिपकायला सुरुवात होते. त्यातही गंजलेला पत्रा असला तर तांबूस डाग पांढऱ्याशुभ्र कपड्यावर पडलाच म्हणून समजा. पण हे प्रसंग यंदा फारसे अनुभवास मिळाले नाहीत. कोरोना काळात ही सर्व कामे करण्यात आली होती. राज्य परिवहन महामंडळाची एसटी ही सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी असते. हजारो नोकरदार दररोज एसटीने कामाच्या ठिकाणी ये-जा करतात. मात्र पूर्वी अनेक गाड्या गळक्या असायच्या. त्यामुळे प्रवास करणं डोकेदुखी वाटत असायची. हे चित्र दरवर्षीच अनुभवास मिळत असायचे. मात्र सातारा जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट साधारणत: फेब्रुवारीत आली आणि मार्चपासून एसटी पुन्हा बंद करावी लागली. मात्र एसटी आगार, कार्यशाळेतील कर्मचारी येतच होते. त्यांच्या ठरलेल्या वार्षिक नियोजनानुसार सर्व कामे सुरू होती. गाड्या आगारातच असल्याने या काळात सर्व डागडुजी करण्यात आली आहे.

एकही गाडी गळकी नाही

सातारा विभागात साडेसातशे एसटी गाड्या आहेत. सर्व गाड्यांची दुरुस्ती, डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणती गाडी गळकी असल्याची अजूनही एकही तक्रार आलेली नाही.

- सुहास भोसले, विभागीय यंत्र अभियंता, चालन

कोट :

एसटीतील अधिकारी कितीही एसटी सुस्थितीत असल्याचे सांगत असले तरी ग्रामीण भागात येणाऱ्या गाड्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. अनेक गाड्या गळत असतात. हेडलाइटच लागत नाही. तर काहींचे वायफर नादुरुस्त असतात.

- सागर माने, सातारा

कोट :

एसटीतील जुन्या बनावटीच्या पत्र्याच्या गाड्या गळक्या होता. आता आलेल्या गाड्यांमध्ये ही समस्या दिसत नाही. त्यामुळे अशाच गाड्या रस्त्यावर आणल्या तर समस्या भेडसावणार नाही.

- विलास साबळे, सातारा

चौकट

आसनावरील कुशनची मात्र वाट लागली

लॉकडाऊन काळात एसटी गाड्या एकाच ठिकाणी उभ्या होत्या. या काळात कारागिरांनी भलेही यांत्रिक कामे नियमित केले. गाड्या सुरू करणे, एखादी फेरी मारून पुन्हा लावल्या आहेत. त्यामुळे यांत्रिक बिघाड जाणवले नाहीत.

आतील भागांचा वापरच न झाल्याने आसनांची, कुशनची मोठ्या प्रमाणावर नादुरुस्ती झाली आहे. अनेक गाड्यांचे सीट फाटले आहेत. त्यामुळे अडचणी येत आहेत.

अनेक शिवशाही गाड्यांचे दरवाजे उघडे होते. त्यामुळे कोणीही येऊन बसत असायचे. त्यामुळे अनेकदा पडदेही चोरीला गेले आहेत. त्यामुळे आगीची घटना घडल्यानंतर हे प्रमाण कमी आले आहे.

Web Title: Repair of seven and a half hundred vehicles completed in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.