उत्पन्नवाढीसाठी ‘पंचायती राज’ला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:07 PM2018-04-11T23:07:31+5:302018-04-11T23:07:31+5:30

Repeat the 'Panchayati Raj' for the growth | उत्पन्नवाढीसाठी ‘पंचायती राज’ला साकडे

उत्पन्नवाढीसाठी ‘पंचायती राज’ला साकडे

Next


सातारा : जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या वतीने साताऱ्यात दाखल झालेल्या पंचायती राज समितीच्या सदस्यांपुढे केली.
जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पंचायती राज समिती बुधवारी (दि. ११) साताºयात दाखल झाली. शासकीय विश्रामगृहावर या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे (नागपूर) यांच्यासह विविध राज्यांतील २८ आमदार, विधानमंडळाचे १० अधिकारी, कर्मचारी, ग्रामविकास विभागाचे दोन अधिकारी, स्थानिक लेखा निधीचे संचालक, सहसंचालक, उपायुक्त, सहायक आयुक्त यांचा समावेश असणाºया या समितीचे स्वागत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. अर्थ व शिक्षण समितीचे सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, सातारा पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम तसेच अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
विश्रामगृहावर सकाळी आमदार मकरंद पाटील व आमदार शंभूराज देसाई यांनी समितीच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाºयांनी समितीची भेट घेतली.
जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून १ टक्का इतकी स्टँम्प ड्युटी जिल्हा परिषदेला मिळते. त्यात ५ टक्क्यांपर्यंत वाढ होणे आवश्यक आहे. पंचायत समितींना १४ व्या वित्त आयोगातून निधी मिळाला तर सदस्यांना हा निधी वापरणे शक्य होईल. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला वेगळा निधी मिळणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या जागा विकसित करण्यासाठी मंजुरी मिळणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे बजेट अवघे ६४ कोटींचे आहे, या निधीतून विकासकामे करणे अवघड होत असल्याची समस्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर व इतरांनी मांडली.
दरम्यान, यानंतर ही समिती जिल्हा परिषदेत दाखल झाली. महात्मा जोतिबा फुले यांची जयंती असल्याने सुरुवातीला त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ही समिती चौथ्या मजल्यावरील सभागृहाकडे गेली. सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह निवडक अधिकाºयांनाच प्रवेश देण्यात आला. कामाव्यतिरिक्त इतर कारणासाठी आलेल्या लोकांना बाहेर पाठविण्यात आले. अनेक अधिकाºयांनाही बाहेरच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या.
यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात २०१२-१३ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदासंबंधात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची साक्ष झाली. विविध विभागांतील खातेप्रमुखांशी समितीने चर्चा केली. सायंकाळी उशिरापर्यंत कामकाज सुरू होते.
गुरुवार, दि. १२ रोजी सकाळी नऊपासून जिल्ह्यातील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायतींना भेटी, पंचायत समिती गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाºयांची साक्ष होईल. शुक्रवार, दि. १३ रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्या कारभाराचे २०१३-१४ च्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची साक्ष होणार आहे.

शोभेची झाडे अन् रांगोळ्याही
समितीच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये ठिकठिकाणी शोभेची झाडे असणाºया कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्याभोवती रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. सभागृहातही कार्पेट टाकण्यात आले होते.

Web Title: Repeat the 'Panchayati Raj' for the growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.