मानवी साखळीतून ‘७५ इंडिया’ची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:38 AM2021-03-18T04:38:46+5:302021-03-18T04:38:46+5:30

मलकापूर : १५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शासन स्तरावर ...

Replica of '75 India 'from the human chain | मानवी साखळीतून ‘७५ इंडिया’ची प्रतिकृती

मानवी साखळीतून ‘७५ इंडिया’ची प्रतिकृती

googlenewsNext

मलकापूर : १५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शासन स्तरावर देशभर विविध उपक्रमाने साजरा होणार आहे. त्यातीलच एक भाग म्हणून वन विभागाच्यावतीने ७५० शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्याची सुरुवात मलकापुरातील मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनिअर कॉलेज व आनंदराव चव्हाण विद्यालयात मानवी साखळीतून ‘७५ इंडिया’ची प्रतिकृती साकारून करण्यात आली.

यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, शेतीमित्र अशोकराव थोरात, शीतल मगर, संदीप कुंभार, बाबासाहेब माने, निखिल कालेकर, सुरेश लाखे, सिद्धेश काटकर, पी. जी. पाटील, बी. बी. पाटील, तुळशीराम शिर्के, प्रा. संजय थोरात, वसंतराव चव्हाण, डॉ. स्वाती थोरात उपस्थित होते.

उपसंचालक उत्तम सावंत म्हणाले, ‘मानवाने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरण, वन्य जिवांचे जतन व संरक्षण केले तरच मानवी जीवन सुरक्षित राहील. निसर्ग, प्राणी, औषध वनस्पती यांचे संवर्धन सुरक्षितता मानवाच्या हातात आहे. त्यामुळे देशाचा सुजाण व जबाबदार नागरिक म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे.

यावेळी अशोकराव थोरात यांचे भाषण झाले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती करण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने पर्यावरण व वन्यजीव संरक्षण जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. चित्रफितीद्वारे वन विभागाच्या, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत निसर्ग संवर्धन कार्याची माहिती दिली.

उपप्राचार्य शेखर शिर्के यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. डी. खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. एस. डी. पाटील यांनी आभार मानले.

फोटो : १७केआरडी०३

कॅप्शन : मलकापूर येथे मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनिअर कॉलेज व आनंदराव चव्हाण विद्यालयात मानवी साखळीतून ‘७५ इंडिया’ची प्रतिकृती साकारण्यात आली.

Web Title: Replica of '75 India 'from the human chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.