साताऱ्यातील 'या' गावात साकारतायत राज्यातील चाळीस किल्ल्यांच्या प्रतिकृती, इतिहासही ऐकण्याची व्यवस्था
By प्रगती पाटील | Published: November 13, 2023 06:46 PM2023-11-13T18:46:22+5:302023-11-13T18:46:36+5:30
सातारा : परांडा, कलावंतीन दुर्ग, राज गड , कंक्राळा, रामशेज, पार गड , सरसगड, विशाळगड, पन्हाळा, रायगड, तिकोणा ,अजिंक्यतारा, ...
सातारा : परांडा, कलावंतीन दुर्ग, राजगड, कंक्राळा, रामशेज, पारगड, सरसगड, विशाळगड, पन्हाळा, रायगड, तिकोणा ,अजिंक्यतारा, प्रतापगड , पद्मदुर्ग, शिवनेरी, वैराटगड, लोहगड, सिंहगड, दातेगड आदी ४० किल्ल्यांची प्रतिकृती परळी खोऱ्यातील आंबवदे या गावात साकारत आहेत. इतिहासाचे साक्षीदार असलेले किल्ले पाहण्याबरोबर त्याचा इतिहासही यंदा ऐकायला मिळणार आहे.
दिवाळीच्या सुट्टीत घराच्या आवारात किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या जुन्या परंपरेकडे सध्याच्या स्मार्टफोन युगात दुर्लक्ष झाले आहे. मात्र, सातारा तालुक्यातील अंबवडे बु गावमध्ये ही परंपरा आजही सुरू आहे. सध्या या परंपरेला अधिक व्यापक स्वरूप आले आहे. ते पाहण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील लोक गर्दी करीत असतात, त्यामुळे गावाला ऐन दिवाळीत यात्रेचे स्वरूप येत आहे. गावात दरवर्षी ४० ते ५० मोठ्या किल्लीचे प्रतिकृतीचे १ ते २ गुठे तसेच पूर्ण शेतात एवढया मोठ्या आकारात किल्ले उभारले जातात.
गावातील आबालबुद्ध प्रयत्नशील
गेल्या चार वर्षांपासून सातारा तालुक्यातील आंबवडे या गावात किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्याची प्रथा रूढ होऊ लागली आहे. किल्ले उभारण्यासाठी गावातील आबालबुद्ध प्रयत्नशील असतात. यंदा हिरकणीची कड्यावरून उतरतानाची बालमावळ्यानी बसवलेली नाटिका बघण्याचा आनंद इतिहास प्रेमींना घेता येणार आहे. तब्बल ४० किल्ल्यांची प्रतिकृती सादर करण्याची किमया येथील बामावळ्यांनी साकारली आहे.
अशी उभी राहते प्रतिकृती
किल्ला बनवताना मुलं कमीत कमी खर्च करत असतात, म्हणजे तटबंदी बनवताना माती, शेण राख, भुसा चा वापर करून केलेले आहे. तर सैनिक, घर ,मंदिर पुष्टयाची बनवलेली आहेत शिवनेरी, वैराटगड, राजगड, विशाळगड, पन्हाळा, रायगड, अजिंक्यतारा, सजनगड यांसारख्या डोंगरी किल्ल्यांबरोबरच पद्मदुर्ग सारखे सागरी किल्ले देखील हुबेहूब साकारले आहेत. किल्ल्यांच्या देखाव्या बरोबरच त्या किल्ल्याची माहिती व इतिहास किमान दहा मिनट बाल मावळे सांगतात.
किल्ला करताना किवा गडकोट किल्ला उभा करताना तो एखाद्या गड दुर्गासारखा हुबेहूब व्हावा असा अट्टाहास नसतो. मात्र तो किल्ला उभा करण्यापाठी मागची भावना मात्र राजगडला टक्कर देईल माझा बनवलेला दुर्ग अशी असते. - राजेश जाधव, आंबवडे