सातारच्या युवकालाही पुष्पवर्षाव करीत सोडले घरी कोरोना बाधीत युवकाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 12:08 PM2020-04-18T12:08:18+5:302020-04-18T16:42:27+5:30

कोरोना बाधीत ३५ वर्षीय युवक  पूर्णपणे बरा झाला असून त्याला आज घरी सोडले अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

Report of a 4-year-old youth in Corona interrupted | सातारच्या युवकालाही पुष्पवर्षाव करीत सोडले घरी कोरोना बाधीत युवकाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

सातारच्या युवकालाही पुष्पवर्षाव करीत सोडले घरी कोरोना बाधीत युवकाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देआता एकूण सात कोरोना बाधित जिल्ह्यात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सातारा : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या ३५ वर्षीय तरूणाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याचे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोना मुक्त झाल्याचा अहवाल बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविला आहे.

मुंबई वरून प्रवास करून आलेल्या  या ३५ वर्षीय युवकावर कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज मध्ये  कोरोना ( कोविड 19 ) बाधित म्हणून उपचार सुरु होते. त्याची १४ व १५ दिवसा नंतर पुन्हा टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये हा कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आला आहे. कोरोना बाधीत ३५ वर्षीय युवक  पूर्णपणे बरा झाला असून त्याला आज घरी सोडले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या एकूण ११ होती. यापूर्वी  एका महिला  रुग्णाचा अहवाल १४ आणि १५ दिवसानंतर निगेटिव्ह आला होता. त्या महिला रुग्ण पूर्णपणे बºया झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे. तसेच २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आता एकूण सात कोरोना बाधित जिल्ह्यात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

Web Title: Report of a 4-year-old youth in Corona interrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.