क-हाडचे लोकप्रतिनिधी यशवंत विचारांचे पाईक !-आबासाहेब पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 11:11 PM2019-11-02T23:11:56+5:302019-11-02T23:13:23+5:30
क-हाड ही यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे आणि त्या तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून मला काम करण्याची मिळालेली संधी, हे मी भाग्य समजतो. - आबासाहेब पवार, गटविकास अधिकारी, क-हाड
प्रमोद सुकरे ।
क-हाड तालुक्याचा आवाका मोठा आहे. येथे काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, येथील लोकप्रतिनिधी यशवंत विचारांचे पाईक असल्यामुळे काम सुलभ होतं, असं गटविकास अधिकारी आबासाहेब पवार सांगतात. याविषयी त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्रश्न : क-हाड पंचायत समिती जिल्ह्यात मोठी आहे. येथे काम करताना काय अनुभव वाटतो?
उत्तर : पंचायत समिती तुलनेने मोठी आहे, त्यामुळे येथे कामही जास्त आहे. मात्र, कºहाडचे लोक प्रगल्भ असल्याने काम करताना सुलभच होते. येथील लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे पाईक असल्याने त्यांचेही सहकार्य लाभते.
प्रश्न : पंचायत समितीच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना तुम्ही राबविता? त्याला कसे यश मिळते?
उत्तर : शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं हेच काम आहे. स्वच्छता अभियान, पंतप्रधान आवास योजना, शेती सुधार योजना, रोजगार हमी योजना, रमाई आवास योजना यांचे दरवर्षी उद्दिष्टापेक्षा जास्त काम आम्ही केले आहे. विशेषत: दारिद्र्य निर्मूलनच्या उद्देशाने राबविले जाणारे महाराष्ट्र ग्रामीण जीवनउन्नती अभियान आम्ही प्रभावीपणे राबवत असतो. महिलांना संघटित करून त्यांना सुलभपणे कर्ज उपलब्ध करून देणे व रोजगार उपलब्ध करून देणे हे काम यातून होते.
प्रश्न : अनेक गावांना पूर्ण वेळ ग्रामसेवक नाहीत. अडचणी येतात.
उत्तर : तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त आहेत. मोठ्या गावांना ही पदे रिक्त नाहीत. १ हजार ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असणाºया गावांची जबाबदारी नजीकच्या ग्रामविकास अधिकाºयाकडे सोपविण्यात आली आहे.
बीएएमएस डॉक्टर नियुक्त
प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाºया डॉक्टरांनी तेथेच राहायला हवे. त्यांना तशा सूचना आम्ही केल्या आहेत. पूर्वी तेथे एमबीबीएस डॉक्टर असायचे. पदे रिक्त होती. उपलब्ध डॉक्टरही रजेवर गेल्यानंतर अडचणी व्हायच्या. मात्र, आता प्रत्येक ठिकाणी बीएएमएस डॉक्टर नेमले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारी नाहीत.
अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे
पंचायत समितीच्या मासिक बैठकीला काही अधिकारी गैरहजर असतात. त्यांच्यावर कारवाईची मागणी होते. मात्र, कायदेशीर तरतूद अपुरी आहे. तरीही आम्ही जिल्हाधिकाºयांकडे पत्रव्यवहार केला आहे. अधिकाºयांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.
पंचनामे सुरू
शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांचा दौराही आहे.