महामार्गाची दुरवस्था संपेपर्यंत टोलमुक्तीसाठी शरद पवारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 04:07 PM2019-11-07T16:07:45+5:302019-11-07T16:08:47+5:30

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था संपेपर्यंत या रस्त्यावरील पथकर आकारू नये, असे निवेदन सातारकरांच्या वतीने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आनेवाडी टोल नाक्यावर देण्यात आले.

Request for Sharad Pawar for toll-free till highway condition is reached | महामार्गाची दुरवस्था संपेपर्यंत टोलमुक्तीसाठी शरद पवारांना निवेदन

महामार्गाची दुरवस्था संपेपर्यंत टोलमुक्तीसाठी शरद पवारांना निवेदन

Next
ठळक मुद्दे टोलमुक्तीसाठी शरद पवारांना निवेदनमहामार्गाची दुरवस्था संपेपर्यंत पथकर आकारू नये

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था संपेपर्यंत या रस्त्यावरील पथकर आकारू नये, असे निवेदन सातारकरांच्या वतीने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आनेवाडी टोल नाक्यावर देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, 'सातारा - पुणे या प्रवासाच्या वेळेत वाढ होण्याबरोबरच शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.

या रस्त्यावरून प्रवास करताना सोयीसुविधांच्या अभावामुळे होणारी गैरसोय, जीवित व वित्त हानी, मानसिक त्रास लक्षात घेता टोल का भरावा असा समस्त सातारा जिल्हावासियांना प्रश्न पडला आहे.

जोपर्यंत सुविधा उपलब्ध होत नाहीत तोवर टोलमुक्ती करण्याचे ही यात नमूद केले आहे.' यावेळी रवींद्र नलवडे, महारुद्र तिकुंडे, महेश पवार, नितीन काटे, महेश महामुनी उपस्थित होते.

Web Title: Request for Sharad Pawar for toll-free till highway condition is reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.