महिला आरक्षणामुळे दिग्गजांची धावपळ...!

By admin | Published: December 23, 2016 11:06 PM2016-12-23T23:06:51+5:302016-12-23T23:06:51+5:30

पोळ गटाचा प्रभाव : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ताकद वाढल्याने प्रतिष्ठा लागणार पणाला

Reservations of the giants due to women reservation ...! | महिला आरक्षणामुळे दिग्गजांची धावपळ...!

महिला आरक्षणामुळे दिग्गजांची धावपळ...!

Next

सचिन मंगरुळे ल्ल म्हसवड
राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मार्डी जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांचा उमेदवारीचा या गटातील पत्ता कट झाल्याने त्यांना उमेदवारीसाठी इतर गटांचा आसरा घ्यावा लागणार आहे. तर माजी सभापती श्रीराम पाटील यांच्याही वरकुटे-म्हसवड गणात ओबीसी महिला आरक्षण पडल्याने त्यांनाही इतरत्र उमेदवारी करावी लागणार आहे. मार्डी जिल्हा परिषद गट दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ तात्यांचा होम ग्राऊंड असल्याने या गटात राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ असली तरी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ताकद या गटात वाढल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, मागील पराभवाची परतफेड करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसनेही कंबर कसली आहे.
मार्डी जिल्हा परिषद गटात गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे निवडून आले होते. परंतु या गटातील आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांचा उमेदवारीचा पत्ता कट झाल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणूक कोणत्या गटातून ते करणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर जिल्हा परिषद मार्डी गटात सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या घरातील महिलेस उमेदवारीची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर काँग्रेस कडून विद्यमान पंचायत समिती सदस्या शिला पोळ यांना बढती मिळण्याची शक्यता असून, त्यांना या गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष रिंगणात उतरवू शकते तर विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांच्या पत्नीला वरकुटे-म्हसवड गणात ओबीसी महिला आरक्षण पडल्याने त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर या गणात ‘रासप’चे नेते बबनदादा वीरकर यांच्या घरातील महिलेला उमेदवारीसाठी नावाची चर्चा आहे. तर मार्डी गणात मागासवर्गीय पुरुष आरक्षण जाहीर झाल्याने राष्ट्रवादी कडून रमेश पाटोळे व नितीन सावंत इच्छुक असल्याची चर्चा असली तरी काँग्रेसकडील इच्छुकांची नावे गुलदस्त्यात आहेत.
मार्डी गटातील प्रमुख गावांतील मोठ्या मतदार संख्या असलेल्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांची सत्ता असून, या गटातील अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारांची सत्ता असल्याने या निवडणुकीत गटात व गणात काटे की टक्कर पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
म्हसवड पालिकेत आमदार गोरेंना पालिकेच्या सत्तेतून पायउतार करण्यासाठी आमदार गोरे यांचे सर्व विरोधक एकत्रित येत शेखरभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवून पालिकेच्या सत्तेत परिवर्तन घडवल्याने आमदार विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे. या निवडणुकीत हाच म्हसवड पॅटर्न आमदार गोरेंचे विरोधक राबविणार का? सर्व विरोधक वेगवेगळे लढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मार्डी गटात शिवसेना स्वतंत्र लढणार का? या गटात शिवसेनेचे रंगकामगार सेनेचे अध्यक्ष विश्वासराव साळुंखे, रंगकामगार ठेकेदार सेनेचे कार्याध्यक्ष धनाजी सावंत, माण तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी यांचे होम पिच असल्याने या गटात सेना पक्षाच्या चिन्हावर स्वतंत्र लढणार की महायुतीच्या माध्यमातून दोन्ही काँग्रेसला टक्कर देणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीत गोरे बंधूंचा हाय व्होल्टेज झटका
सद्य:स्थितीत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, महायुतीतील घटक पक्ष एकत्रित येत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवतील, असा अंदाज राजकीय जानकारांकडून वर्तवला जात असला तरी अंतिम चित्र स्पष्ट होई पर्यंत तिरंगी ऐवजी बहुरंगी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या तीन वर्षांत माण तालुक्यातील कोणतीही निवडणूक असूद्या त्या निवडणुका आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे समर्थकांमध्ये झाल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकही या दोन्ही बंधंूतच लढली जाणार असल्याने हाय व्होल्टेज निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Web Title: Reservations of the giants due to women reservation ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.