कोयना धरणातील साठा ७० टीएमसीच्या जवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 02:14 PM2020-08-07T14:14:12+5:302020-08-07T14:20:15+5:30

पावसामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक होत असून २४ तासांत साठ्यात साडे तीन टीएमसीने वाढ झाली. सकाळी पाणीसाठा ६९.११ टीएमसी ऐवढा झाला होता.

Reserves in Koyna Dam are close to 70 TMC | कोयना धरणातील साठा ७० टीएमसीच्या जवळ

कोयना धरणातील साठा ७० टीएमसीच्या जवळ

googlenewsNext
ठळक मुद्देकोयना धरणातील साठा ७० टीएमसीच्या जवळपश्चिमेकडे पाऊस सुरूच : नवजा १०७ तर महाबळेश्वरला १४५ मिलीमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला १५०, नवजा १०७ आणि महाबळेश्वरला १४५ मिलीमीटर पाऊस झाला. तर या

पावसामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक होत असून २४ तासांत साठ्यात साडे तीन टीएमसीने वाढ झाली. सकाळी पाणीसाठा ६९.११ टीएमसी ऐवढा झाला होता.

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १५० तर जूनपासून आतापर्यंत २५६८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वरला १४५ मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर येथे आतापर्यंत २७४९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजाला १०७ तर आतापर्यंत २७९९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक होत आहे.

शुक्रवारी सकाळी कोयना धरणात २०४६१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ६९.११ टीएमसी इतका झाला होता.

२४ तासांत धरणसाठ्यात जवळपास साडे तीन टीएमसीने वाढ झाली असून टक्केवारी ६५.६६ टक्के आहे. तर धरणातील विसर्ग बंदच आहे.

 

 

 

Web Title: Reserves in Koyna Dam are close to 70 TMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.