नेर विकास सोसायटीचा ठराव रद्द करावा : संजय चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:16+5:302021-02-23T04:59:16+5:30

पुसेगाव : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विविध कार्यकारी सोसायटीचे मतदानासाठी ठराव होऊ ...

Resolution of Ner Vikas Society should be canceled: Sanjay Chavan | नेर विकास सोसायटीचा ठराव रद्द करावा : संजय चव्हाण

नेर विकास सोसायटीचा ठराव रद्द करावा : संजय चव्हाण

Next

पुसेगाव : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विविध कार्यकारी सोसायटीचे मतदानासाठी ठराव होऊ लागले आहेत. नेर येथील विकास सेवा सोसायटीचे काही संचालक व सचिव नितीन देशमुख यांनी संगनमताने जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मतदान ठराव बेकायदेशीर केला आहे. सदरचा मतदान ठराव रद्द करून नव्याने ठराव करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे नेर विकास सेवा सोसायटीच्या सहा संचालकांनी केली.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नेर विकास सेवा सोसायटीत तेरा संचालकांपैकी एक मृत तर दोन अपात्र असल्याने सध्या दहा संचालक कार्यरत आहेत. जिल्हा बँकेसाठी मतदान ठराव करण्यापूर्वी नेर विकास सेवा सोसायटीचे सचिव नितीन देशमुख यांनी संचालक मंडळाला नोटीस काढून ३० जानेवारीला बैठक घेतली. या मीटिंगसाठी कार्यरत असणार्‍या दहा संचालकांपैकी केवळ चार संचालक उपस्थित होते. त्यामुळे सदरची मीटिंग कोरमअभावी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे संबंधित ठराव रद्द करण्यात यावा.

Web Title: Resolution of Ner Vikas Society should be canceled: Sanjay Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.