महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:33+5:302021-03-13T05:12:33+5:30
सातारा : येथील दिव्यांग प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नंदकुमार धनवडे, अनिता ...
सातारा : येथील दिव्यांग प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नंदकुमार धनवडे, अनिता धनवडे, प्रतिमा कदम, नरेंद्र वानखेडे, कॉ. उमेश खंडूझोडे, श्रीनिवास बडेकर, प्रशांत वारकर, तबरेज बागवान, अनिल वीर, जैलानी इनामदार, पप्पू नावडकर आदी उपस्थित होते.
भाविकांविना महाशिवरात्री
सातारा : शिखर शिंगणापूर येथील दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा महाशिवरात्रीचा उत्सव यंदा भाविकांशिवाय पार पडला. ना भाविकांचा गर्दीगोंगाट ना हरहर महादेवचा जयघोष अशा वातावरणात केवळ सेवाधारी मंडळींच्या उपस्थितीत उत्सव पार पडला.
बँका पाच दिवस बंद
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक हैराण असतानाच, दुसरीकडे मार्चएंडची लगबग सुरू झाली आहे. त्यातच बँकांच्या समायोजनास विरोध करत कर्मचारी संघटनांनी १५ व १६ मार्चला संप पुकारला आहे. शासकीय सुट्यांना जोडून हा संप होणार असल्याने पुढील सलग पाच दिवस बँकांमध्ये ग्राहकांना सेवा मिळणार नाही.
कारवाईसाठी मनसेचे निवेदन
सातारा : कुडाळ, मेढा, सायगाव, करहर, सोनगाव, सरताळे, हुमगाव, पानस, महू, धरण परिसरात मोठया प्रमाणावर अवैध दारू विक्री, मटका व जुगार अड्डे सुरू असून, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत जावली तालुका मनसेच्यावतीने मेढा सपोनी अमोल माने यांना निवेदन दिले.
सन्मानपत्र देऊन गौरव
सातारा : जिल्ह्याच्या वार्षिक पत आराखड्यामध्ये कर्ज वितरणासाठी सातारा जिल्हा बँकेने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वितरण केले आहे. ही कामगिरी केल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याहस्ते बँकर्स सभेमध्ये सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.