मंद्रुळकोळेत कोरोना लसीकरणास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:39 AM2021-04-07T04:39:44+5:302021-04-07T04:39:44+5:30
लसीकरण मोहिमेचा प्रारंभ गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांच्या उपस्थितीत झाला. या मोहिमेस ...
लसीकरण मोहिमेचा प्रारंभ गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांच्या उपस्थितीत झाला. या मोहिमेस ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. पाटण तालुका काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी पाटील यांनी या मोहिमेत कोरोना लस घेतली. यावेळी सरपंच अमोल पाटील, पोलीस पाटील विजय लोहार, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.
कोरोनाची दुसरी लाट चालू झाली असून परिस्थिती गंभीर होत आहे. अशावेळी शासनाने ४५ वर्षावरील नागरिकांना मोफत लसीकरण चालू केले आहे. याविषयी जागृतीही सुरू आहे. मंद्रुळकोळेचे सरपंच अमोल पाटील यांनी ध्वनिक्षेपक असलेल्या गाडीचे नियोजन करून संपूर्ण गावात लसीकरण संदेश पोहचवला होता. याशिवाय आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फतही संदेश देण्यात आला होता. काही ग्रामस्थांनी या अगोदर ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात लस घेतली होती. तर मोहिमेत सुमारे १८० ग्रामस्थांनी लस घेतली आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सणबूर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सीएचओ डॉ. कोमल लोकरे, बंडू घोडेकर, डॉ.सुनील जाधव, आरोग्य सेविका मेघा मराठे, आरोग्य सेवक शंतनू पाटील, कुलदीप मसने यांनी परिश्रम घेतले.
फोटो : ०६केआरडी०२
कॅप्शन : मंद्रुळकोळे, ता. पाटण येथे काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी पाटील यांनी कोरोना लस घेतली.