बंदीवानांनी घातले सुर्यनमस्कार, सातारा जिल्हा कारागृहात योगासन प्रशिक्षणाला प्रतिसाद
By प्रगती पाटील | Published: June 21, 2023 01:42 PM2023-06-21T13:42:22+5:302023-06-21T13:43:35+5:30
सातारा : येथील समर्थ एज्युकेशन ट्रस्टच्या सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिकारी व विद्यार्थी यांच्यामार्फत सातारा जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी ...
सातारा : येथील समर्थ एज्युकेशन ट्रस्टच्या सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिकारी व विद्यार्थी यांच्यामार्फत सातारा जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी योगासनाचे महत्त्व जाणून देणारा एकदिवसीय योगासन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. बंदीवांनानी सूर्यनमस्कार घातले.
बंद्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी व शरीर उत्तम ठेवण्यासाठी योगासनाचे महत्त्व सांगून योगासनाचे विविध प्रकार दाखवण्यात आले व त्यांच्याकडून करून घेण्यात आले. कॉलेजच्या योगशिक्षिका डॉ. शितल इनामदार यांनी बंद्यांना योगासनाचे महत्त्व सांगितले. कॉलेजचे विद्यार्थी ऋतुजा जंगम व ऋषिकेश जंगम यांनी बंद्यांना योगासनाचे प्रकार करून दाखवले. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या एक दिवशी योग शिबिरामध्ये बंद्यांनी देखील योगासनाचे सर्व प्रकार स्वत: केले.
या शिबिरास सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे डॉ. मकरंद वाळवेकर, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, सुभेदार महेंद्र सोनवणे, शिपाई संजय यादव, प्रेमनाथ वाडीकर, अहमद संदे, चेतन शहाणे, चांद पटेल इत्यादी उपस्थित होते.