औषधांबाबतचे नियोजनची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:40 AM2021-04-08T04:40:15+5:302021-04-08T04:40:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती सातारा जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती सातारा जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे. कामकाज पूर्ण करण्याकामी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनिषा जवंजाळ यांची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नियुक्ती आदेशान्वये केली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून कोविडबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरविणे आवश्यक असून यासाठी पुरेशा प्रमाणात औषध साठा असणे आवश्यक आहे. याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे व त्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे.
जवंजाळ यांनी पार पाडावयाची जबाबदारी पुढीलप्रमाणे : कोविड-१९ संक्रमित रुग्णांची रुग्णालयातील दैनंदिन दाखल संख्येबाबत सर्व हॉस्पिटल प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवावा. जिल्ह्यातील मेडिकल ऑक्सिजन, रेमिडिसवर इंजेक्शन व अन्य अनुषंगिक औषधांचा तुटवडा भासणार नाही यासाठी तत्काळ नियोजन आखणे. कोविड-१९ चे औषधोपचार न मिळाल्याचे कारणाने मृत्यू होणार नाहीत, यासाठी औषध वितरण व्यवस्था सुरळीत पार पाडली जाईल याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. जिल्ह्यात औषधांचा काळाबाजार, अवैध साठेबाजी होणार नाही यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात. कामकाज हे आपल्या स्तरावरुन आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्या सहायाने पार पाडावे, असेही आदेशात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले आहे.