पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:47+5:302021-07-07T04:48:47+5:30

कऱ्हाड : शहरासह तालुक्याला मुसळधार पावसाने १९ जूनपर्यंत झोडपून काढल्यानंतर गत दोन आठवड्यांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. त्यामुळे ...

The rest of the rains raised concerns among farmers | पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

Next

कऱ्हाड : शहरासह तालुक्याला मुसळधार पावसाने १९ जूनपर्यंत झोडपून काढल्यानंतर गत दोन आठवड्यांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. १६ जून रोजी रात्री अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भुईमूग तसेच सोयाबीनची टोकणी करण्यात आली. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिली असून, भुईमुगासाठी पावसाची गरज आहे. गत काही दिवस शहर परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, आता दिवसभर कडक ऊन पडत असून शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.

दुभाजकात झुडुपे, गवताचे साम्राज्य

कार्वे : कऱ्हाड ते कार्वेदरम्यान रस्त्यातील दुभाजकात सध्या गवत जोमाने उगवले आहे. दुभाजकातील झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दुभाजकाची स्थिती बिकट बनली आहे. शोभेची फुलझाडे होरपळून गेली आहे. तसेच ठिकठिकाणी दुभाजकाचे दगडही कोलमडून पडले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य नाहीसे झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने नवीन शोभेची झाडे लावून दुभाजकाचीही दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

ढेबेवाडी-मुंबई बसमुळे प्रवाशांमध्ये समाधान

सणबूर : नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईशी नियमित संपर्क असलेल्या ढेबेवाडी विभागातील जनतेसाठी कऱ्हाड आगाराने ढेबेवाडी ते मुंबई ही एसटी सेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. ढेबेवाडी विभागातील अनेकजण नोकरी तसेच व्यवसायामुळे मुंबईत वास्तव्याला आहेत. त्यामुळे या विभागातून मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. कऱ्हाड आगाराने ढेबेवाडी ते मुंबई ही बससेवा सुरू केली असून, प्रवाशांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: The rest of the rains raised concerns among farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.