ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी साताऱ्यात निर्बंध आणखी कडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 07:23 PM2021-12-31T19:23:02+5:302021-12-31T19:23:50+5:30

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एक जानेवारीपासून जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत.

Restrictions in Satara tighten to curb the spread of omecron | ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी साताऱ्यात निर्बंध आणखी कडक

ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी साताऱ्यात निर्बंध आणखी कडक

Next

सातारा : ओमायक्रॉन आणि कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एक जानेवारीपासून जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. विवाह व त्या अनुषांगिक सोहळे बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मोकळया जागेत असो, त्यासाठी उपस्थितांची कमाल संख्या ५० व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल.

कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम मग ते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक इत्यादी सर्व प्रकारचे कार्यक्रम याबाबतीत उपस्थितांची कमाल संख्या ५० व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल. अंत्यसंस्काराच्या बाबतीत, जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या २० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

जिल्हयातील पर्यटन स्थळे, मोकळी मैदाने अथवा जास्त गर्दी होणारी ठिकाणे तसेच लोकांच्या मोठ्या गर्दीला आकर्षित करणारी इतर ठिकाणे याबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी हे, या कार्यालयाकडून निर्गमित केलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या दि.२४ डिसेंबर २०२१ अन्वये आवश्यकतेनुसार फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करु शकतात.

या कार्यालयाकडून यापूर्वी निर्गमित केलेल्या व अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोविड अनुरूप वर्तनाचे नियम/धोरणे, वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय/मुद्दे या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या व अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार/आदेशांनुसार असतील.

Web Title: Restrictions in Satara tighten to curb the spread of omecron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.