रेठरे बुद्रूकला कृष्णा नदीवर ४५ कोटींचा पूल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:47 AM2021-09-09T04:47:07+5:302021-09-09T04:47:07+5:30

कराड, रेठरे बुद्रूक (ता. कराड) येथील कृष्णा नदीवर ४५ कोटी रुपये खर्चाचा नवीन पूल उभारला जाणार आहे. जुन्या पुलाची ...

Rethare Budruk will have a bridge of Rs 45 crore on Krishna river | रेठरे बुद्रूकला कृष्णा नदीवर ४५ कोटींचा पूल होणार

रेठरे बुद्रूकला कृष्णा नदीवर ४५ कोटींचा पूल होणार

Next

कराड,

रेठरे बुद्रूक (ता. कराड) येथील कृष्णा नदीवर ४५ कोटी रुपये खर्चाचा नवीन पूल उभारला जाणार आहे. जुन्या पुलाची दुरुस्तीही होणार आहे. या दोन्ही कामांना शासनाने प्राधान्य दिले आहे. दोन्ही पुलाच्या कामी एकूण ५१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरीस जुना पूल दुरुस्त होईल. व त्यावरील वाहतूक पूर्ववत होईल. नवीन पुलाचे दोन वर्षात काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नातून रेठरे बुद्रूक येथील कृष्णा नदीवर नवीन पूल बांधला जाणार व जुन्या पुलाची दुरुस्ती होणार आहे. नवीन पुलासाठी जमीन धर तपासणीचे काम नुकतेच सुरू झाले आहे. या कामाची आमदार चव्हाण यांनी पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव, उपअभियंता ए. जे. हुद्दार, शाखा अभियंता डी. एन. जाधव, कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जयवंतराव जगताप, पैलवान नाना पाटील, नरेंद्र नांगरे - पाटील, शिवाजी मोहिते, जे.डी. मोहिते, मदनराव मोहिते, अमरसिंह मोहिते, कृष्णत चव्हाण, कराड पंचायत समितीच्या माजी सभापती शोभाताई सुतार, दिग्विजय सूर्यवंशी, बिपीन मोहिते, धनंजय मोहिते, शरद पाटील, राम मोहिते, धनाजी शिंदे, देवदास माने, विनोद पाटील, महेश कणसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सुरुवातीस बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आमदार चव्हाण यांनी कामाचा आढावा घेतला. नवीन पुलाचे २० मीटरचे १५ गाळे तयार होऊन तो सद्याच्या पुलापेक्षा १२ फूट उंच होणार आहे. त्याचा पाया भक्कम असेल. व तो तयार झाल्यानंतर त्याची भार क्षमता चाचणी केली जाणार आहे. येत्या मे अखेरीस जुना पूल दुरुस्त होईल, असे अधिकाऱ्यांनी आढाव्यात नमूद केले.

आमदार चव्हाण म्हणाले, जुना पूल कोटी रुपये खर्चून दुरुस्त होणार आहे. तो मे अखेरीस पूर्ववत होईल. नवीन पुलाचे मद्रास येथील आयटी तज्ज्ञांनी डिझाईन केले आहे. तो पूल उंची होऊन अद्ययावत होणार आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर जुना व नवीन हे दोन्हीही पूल वाहतुकीस उपयुक्त ठरणार आहेत. त्यावर एकेरी वाहतूक होणार आहे.

फोटो

रेठरे बुद्रूक ता.कराड येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या कामाची आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली. यावेळी एस.डी. जाधव, मनोहर शिंदे व इतर

Web Title: Rethare Budruk will have a bridge of Rs 45 crore on Krishna river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.