Satara: रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसे यांना मणिपूरमध्ये वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 11:47 AM2023-12-23T11:47:41+5:302023-12-23T11:47:55+5:30

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले अनिल दिनकर कळसे यांना बुधवार, दि. २० रोजी ...

Rethere Khurd jawan Anil Kalse martyred in Manipur | Satara: रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसे यांना मणिपूरमध्ये वीरमरण

Satara: रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसे यांना मणिपूरमध्ये वीरमरण

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले अनिल दिनकर कळसे यांना बुधवार, दि. २० रोजी मणिपूर येथे सेवेत असताना अपघातात वीरमरण आले. त्यांच्यामागे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. या घटनेचे वृत्त गावात धडकताच गावकरी शोकसागरात बुडाले. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव गावात आणले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

याबाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की, रेठरे खुर्दचे सुपुत्र हवालदार अनिल कळसे हे मणिपूर येथे भारतीय सैन्यदलात हवालदार म्हणून देशसेवा बजावत होते. भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनीअर ग्रुपमधील २६७ इंजिनीअर रेजिमेंटमध्ये सध्या ते कार्यरत होते. २९ सप्टेंबर, २००० मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. २०१७ मध्ये ते सैन्यातून निवृत्त झाले होते; परंतु त्यांनी सेवा वाढवून घेतली होती. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये सेवेतून निवृत्त होणार होते.

पुढील महिन्यात ते सुट्टीवर येणार असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना कळविले होते; परंतु शुक्रवारी सकाळी त्यांना वीरमरण आल्याचे वृत्त धडकताच गावकरी शोकसागरात बुडाले. याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की, बुधवारी दुपारी मणिपूर येथील सैनिक तळावर जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू होते. जवान अनिल कळसे हे तेथे असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळले व त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांना वीरमरण आले. गुरुवारी सायंकाळपर्यंत त्यांच्यावर शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती. ती रात्री उशिरा पूर्ण झाली. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव गावी येणार आहे.

Web Title: Rethere Khurd jawan Anil Kalse martyred in Manipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.