गरिबाचे पैसे परत करा अन्यथा हिसका दाखवू :शशिकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:07 PM2019-12-21T12:07:33+5:302019-12-21T12:21:17+5:30

नोकरी लावण्यासाठी पैसे घेता अन घूमजाव करता, गरिबाचे पैसे खाताना लाज कशी वाटत नाही. संबंधित व्यक्तिचे पैसे तत्काळ परत करा, अन्यथा राष्ट्रवादी काँगे्रस हिसका दाखवेल, असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला.

Return the money of the poor or show a joke: Shashikant Shinde | गरिबाचे पैसे परत करा अन्यथा हिसका दाखवू :शशिकांत शिंदे

गरिबाचे पैसे परत करा अन्यथा हिसका दाखवू :शशिकांत शिंदे

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी भवनात जनता दरबारनोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना इशारा

सातारा : नोकरी लावण्यासाठी पैसे घेता अन घूमजाव करता, गरिबाचे पैसे खाताना लाज कशी वाटत नाही. संबंधित व्यक्तिचे पैसे तत्काळ परत करा, अन्यथा राष्ट्रवादी काँगे्रस हिसका दाखवेल, असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला.

येथील राष्ट्रवादी भवनात शुक्रवारी घेतलेल्या जनता दरबारात शिंदे यांनी जिल्ह्यातील अन्यायग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच अनेकांच्या प्रश्नांबाबत शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क साधून प्रश्न सोडविण्याबाबत सूचना केल्या.

मलकापूर (ता. कऱ्हाड ) शहरातील बाळासाहेब भास्कर निकम यांना पुण्यातील खासगी नोकरीत लावतो म्हणून एका भामट्याने कऱ्हाडातील मध्यस्थाकरवी पैसे घेतले. पैसे देऊन सहा महिने उलटले तरी संबंधिताने वायदा पूर्ण केला नाही. तसेच निकम यांनी वारंवार मागणी करुनही पैसे देण्यास संबंधित भामटा टाळाटाळ करत होता.

नोकरी तर नाहीच पण कष्टाने मिळविलेले पैसेही गेल्याने निकम कुटुंबीय अनेक दिवसांपासून तणावाखाली आहे. या कुटुंबाने शुक्रवारी राष्ट्रवादी भवनात आयोजित केलेल्या जनता दरबारात धाव घेतली. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यापुढे त्यांनी आपली कैफियत मांडली.

शिंदे यांनी संबंधित व्यक्तिला फोन करुन चांगलेच सुनावले.गरिबाने कष्टाने मिळविलेले पैसे असे लुबाडले तर तुम्हाला ते पचणार नाहीत. हे पैसे कसे वसूल करायचे ते आम्हाला चांगलेच माहित आहे, त्यामुळे निकमांना त्यांचे पैसे तत्काळ परत करा, असे शिंदे यांनी सांगताच उद्या साताºयात येतो, असे संबंधिताने आश्वासन दिले.

दरम्यान, या जनता दरबारात महावितरण, महसूल, भूमापन कार्यालय या विभागांसह घरगुती अडचणींबाबतही लोक मोठ्या प्रमाणावर तक्रारी घेऊन आले होते. या दरबारात ५३ तक्रारी दाखल झाल्या. २0१२ साली शेतकऱ्यांनी शेतीपंपाचे वीज कनेक्षण मिळावे, यासाठी पैसे भरले आहेत. मात्र अजूनही वीज जोडणी मिळालेली नाही. काही शेतकऱ्यांचे पोल शिफ्टिंगच्या तक्रारी होत्या. वीजेचा ट्रान्सफॉर्ममर मिळत नसल्याच्याही तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. तसेच पैसे भरुन देखील भूमापन विभाग मोजणीबाबत टाळाटाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या.

शिंदे यांनी त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या. सामान्य नागरिकांवर अन्याय करु नका, अन्यथा हा प्रकार जड जाईल, असा इशाराही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
दरम्यान, मागील जनता दरबारात दाखल झालेल्या ६१ तक्रारींचा निपटारा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.

यावेळी राज्य सरचिटणीस पार्थ पोळके, राजेंद्र लवंगारे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण साबळे-पाटील, युवकचे गोरखनाथ नलावडे, विजय कुंभार, मारुती इदाटे, आदी उपस्थित होते.

सिव्हिलच्या कारभारात सुधारणा करण्याची सूचना

जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपंगत्वाचे दाखले मिळताना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. खासगी तसेच शासकीय नोकरीच्या निमित्ताने युवक-युवतींना मेडिकलची गरज असते. ते वेळेत होत नसल्याने करिअरचे नुकसान होत असल्याचीही तक्रार होती. शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून आपल्या विभागाचा कारभार सुधारावा, अशी सूचना केली.
 

Web Title: Return the money of the poor or show a joke: Shashikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.