काटवलीत श्रमदानातून झ-याला पुनर्जीवन -: लोकचळवळीला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:44 AM2019-11-20T11:44:21+5:302019-11-20T11:45:52+5:30
खडी, वाळू, वीट, लहान -मोठे दगड, गोटे हे डोक्यावरून आणून श्रमदान केले. गेले आठ दिवस काम करीत पाण्याचा झरा पुनर्जीवित केला आहे. त्याकरिता पाण्याच्या झºयाचे वाळू, दगड, गोटे, वीट यांचं पुनर्भरण करून मूळ पाण्याच्या स्त्रोतातील पाणी एकत्र केले. प्रवाहाच्या माध्यमातून एका टाकीत घेतले आहे.
पाचगणी : काटवली ग्रामस्थांनी व ग्रामपरीच्या मार्गदर्शनातून शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगातून डोंगरकपारीत असलेल्या पाण्याच्या झºयाचे पुनर्जीवन के ले. पाण्याचा स्त्रोत प्रवाहित करीत सायफन पद्धतीने पाणी आणले. या नैसर्गिक पाणी पुरवठ्याचा काटवली ग्रामस्थांना फायदा होणार आहे.
काटवली ग्रामस्थांनी डोंगरकपारीत असलेल्या नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत पुनर्जीवित करण्याचे ठरविले. त्याकरिता पाचगणी येथील सामाजिक संस्था ग्रामपरीचे मार्गदर्शन घेतले. तसेच शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगातून पाण्याच्या झºयाचे पुनर्भरण करीत या नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत प्रवाहित केला आहे. याकरिता ग्रामस्थांनी गावापासून पाचगणीच्या रानात तीन किलोमीटर अंतरावर असणाºया नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोताचे पुनर्भरण व पुनर्जीवन के ले.