सत्तावीस वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:38 AM2021-03-16T04:38:39+5:302021-03-16T04:38:39+5:30

आदर्की : फलटण तालुक्यातील महात्मा फुले हायस्कूलचे १९९२ मधील दहावीचे चाळीस विद्यार्थी व ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांनी सत्तावीस वर्षांनंतर एकत्र ...

Revive old memories after 27 years! | सत्तावीस वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा!

सत्तावीस वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा!

Next

आदर्की : फलटण तालुक्यातील महात्मा फुले हायस्कूलचे १९९२ मधील दहावीचे चाळीस विद्यार्थी व ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांनी सत्तावीस वर्षांनंतर एकत्र येऊन स्नेहमेळावा घेऊन विचारमंथन करून अंगणवाडी, प्राथमिक शाळा, महात्मा फुले हायस्कूलला भेटवस्तू दिल्याने, माजी विद्यार्थांनी सामाजिक बांधलकी जपल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

सासवड (झणझणे) ता. फलटण येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये १९९२-९३ मधील दहावीचे विद्यार्थी, शिक्षक एकत्र येऊन प्राथमिक शाळेच्या हॉलमध्ये प्रारंभी सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी विद्यार्थांनी जीवनातील अनुभव व विद्यार्थीदशेतील अनुभव मनोगतात व्यक्त केले. मुख्याध्यापक एम. बी. धुमाळ यांनी सांगितले. आपण जीवन प्रवास करीत असताना आपले शालेय ज्ञान जीवनात उपयोगास आणून एकमेकास साहाय्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यावेळचे शिक्षक एस. बी. थोरात, एस. व्ही. दर्शने, एच. जी. अनपट, एस. बी. कुमठेकर उपस्थित होते. कार्यक्रमास संजय भोईटे, अजय निगडे, राजकुमार अनपट, रवींद्र अनपट, अनिल मुळीक, अंजली जाधव आदी चाळीस विद्यार्थी उपस्थित होते. यशवंत बांदल यांनी स्वागत केले.

जयश्री सुतार यांनी सूत्रसंचालन केले. हरिचंद्र झणझणे यांनी आभार मानले

१५आदर्की

फोटो -

सासवड (ता. फलटण) येथे सत्तावीस वर्षांनंतर दहावीचे विद्यार्थी, शिक्षक एकत्र आले होते.

Web Title: Revive old memories after 27 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.