कऱ्हाड -विटा रस्त्यावर पाण्यात रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 02:15 PM2019-09-25T14:15:47+5:302019-09-25T14:17:11+5:30
कऱ्हाडहून ओगलेवाडीकडे जाणारा कऱ्हाड -विटा रस्ता मंगळवारी रात्रीच्या पावसामुळे पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. त्यातच वारंवार पाणी साठण्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
ठळक मुद्देकऱ्हाड -विटा रस्त्यावर पाण्यात रास्तारोकोनागरिक आक्रमक : वाहने धरली रोखून; वाहतूक विस्कळीत
ओगलेवाडी : कऱ्हाडहून ओगलेवाडीकडे जाणारा कऱ्हाड -विटा रस्ता मंगळवारी रात्रीच्या पावसामुळे पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. त्यातच वारंवार पाणी साठण्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
यामुळे संतप्त झालेल्या कऱ्हाड परिसरातील नागरिकांनी बुधवारी सकाळी दहा वाजता रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उभे राहून रास्ता रोको केले. नागरिकांच्या या आंदोलनामुळे कऱ्हाडकडे येणारी व विटा बाजुला जाणारी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.