सातारी फेट्यात अमीरचे उद्गार, ‘लय भारी !’ अनपटवाडीत ग्रामस्थांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:34 AM2018-03-28T00:34:49+5:302018-03-28T00:34:49+5:30
पिंपोडे बुद्रुक : सातारा जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेची कामे करताना गावकऱ्यांनी दाखविलेली एकी पाहून सातारी फेटा बांधलेल्या अभिनेता अमीर खानच्या तोंडून एकच डॉयलॉग बाहेर पडला, ‘लय भारी !’
पिंपोडे बुद्रुक : सातारा जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेची कामे करताना गावकऱ्यांनी दाखविलेली एकी पाहून सातारी फेटा बांधलेल्या अभिनेताअमीर खानच्या तोंडून एकच डॉयलॉग बाहेर पडला, ‘लय भारी !’.. कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी येथे डॉक्युमेंटरीच्या चित्रिकरणासाठी पत्नी किरण रावसह अमीर खान आले होते.
तुफान आलंया,’ आता पाणी डोळ्यात नाही, तर गावात पाहिजे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे,’ असे आवाहन ‘सत्यमेव जयते पाणी फांऊडेशन’चे अमीर खान यांनी केले. ‘सत्यमेव जयते’ राज्यात गेल्या तीन वर्षांपासून अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात या स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाली आहेत. पहिल्यावर्षी स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता.
वॉटर कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘सत्यमेव जयते’ पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनपटवाडी, (ता. कोरेगाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे काम करून दुष्काळावर मात केली आहे. वॉटर कप स्पर्धेला सुरुवात होण्यास आणखी काही अवधी असताना अमीर खान जलसंधारणाच्या कामांची पाहणी व फाउंडेशनच्या कामांच्या डॉक्युमेंटरी चित्रीकरणासाठी अनपटवाडी, ता. कोरेगाव येथे आले होते.
त्यावेळी त्यांनी अनपटवाडीचे सरपंच मनोज अनपट व ग्रामस्थ यांच्याकडून जलसंधारणाच्या कामांची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, कोरेगाव प्रांत कीर्ती नलावडे, तहसीलदार स्मिता पवार, नायब तहसीलदार विठ्ठलराव पोळ व सरपंच मनोज अनपट आदी उपस्थित होते.
दुष्काळावर मात करण्यासाठी आता युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असून, युवकांनी ‘जलमित्रा’च्या भूमिकेतून श्रमदान अथवा आर्थिकदृष्ट्या सहकार्य करावे. असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना दिले पाणी बचतीचे धडे
औंध : खटाव तालुक्यातील जाखणगाव या गावास अभिनेता अमीर खान यांनी भेट देऊन ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना श्रमदानसह पाणी बचतीबााबत मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, ‘श्रमदानाने अनेक गावे दुष्काळमुक्त झाली असून, आपल्या गावाची एकी महत्त्वाची ठरली आहे. ही एकी अशीच अबाधित ठेवावी.’ तसेच ‘आपण आई-वडिलांच्या जवळ हट्ट धरून डोंगरात जाऊन श्रमदान करावे,’ असे आवाहन जितेंद्र जोशी यांनी केले. यावेळी डॉ. अविनाश पोळ, गीतांजली कुलकर्णी, बाळासो शिंदे यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे अनेक गावांची दुष्काळावर कायमस्वरुपी मात केली असून, यापुढे पाणीदार गाव म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- मनोज अनपट,
सरपंच अनपटवाडी‘पाणी फाउंडेशन’ कार्याच्या चित्रीकरणासाठी ‘फाउंडेशन’चा सर्वेसर्वा अमीर खान याने आमच्या गावाची केलेली निवड हा ग्रामस्थांच्या कार्याचा गौरव आहे.
-रामदास बोबडे,ग्रामस्थ अनपटवाडी.