मायणी परिसरात रिमझिम पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:46+5:302021-05-17T04:37:46+5:30
मायणी : मायणी परिसरामध्ये शनिवारी सायंकाळी चार वाजल्यापासून रविवारचा दिवस अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी वाऱ्यासह येत आहेत. परिसरात ऐन ...
मायणी : मायणी परिसरामध्ये शनिवारी सायंकाळी चार वाजल्यापासून रविवारचा दिवस अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी वाऱ्यासह येत आहेत. परिसरात ऐन उन्हाळ्यात थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पश्चिम किनारपट्टीवर दोन दिवसांपासून चक्री वादळाने थैमान घातले आहे. या चक्रीवादळाचा थोडाफार फायदा दुष्काळी पट्ट्यातील गावांना होताना दिसत आहे. खटाव तालुक्यातील पूर्व व दक्षिण भागात असलेल्या बहुतांश गावांमध्ये शनिवारी सायंकाळी चारपासून वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाच्या हलक्या सरी वाऱ्यासह येत आहे.
वारा व पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने परिसरामध्ये उन्हाळ्यामध्ये संपूर्ण गारवा पसरला आहे हा चक्रीवादळाचा पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. शिवाय उन्हाळ्यात पडत असलेल्या या पावसाच्या हलक्या सरींमुळे परिसरात नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.
चौकट
पावसाळ्यापूर्वी निर्माण झालेल्या या चक्री वादळांमुळे परिसरातील शेतीसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे. या पावसामुळे उन्हाळी पिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. शिवाय जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल, असे वाटते.