कोरेगाव तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या चिंताजनक : शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:42 AM2021-04-28T04:42:02+5:302021-04-28T04:42:02+5:30
कोरेगाव : ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरांबरोबरच ग्रामीण भागात हाहाकार माजविला आहे. वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक बाब असून, प्रत्येकाने आपापली ...
कोरेगाव : ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरांबरोबरच ग्रामीण भागात हाहाकार माजविला आहे. वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक बाब असून, प्रत्येकाने आपापली काळजी घेतलीच पाहिजे,’ असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
भाडळे खोऱ्यातील नागेवाडी येथे वाढती रुग्णसंख्या असल्याने आमदार शिंदे यांनी भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समक्ष अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल १८ जण बाधित सापडले. त्यांच्यावर तातडीने औषधोपचार व्हावेत यासाठी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.
आमदार शिंदे म्हणाले, ‘राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करणे अनिवार्य आहे. शेवटी जीवन आहे, तर सर्व काही आहे. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला असून, यंत्रणा कमी पडेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्वांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे.’
यावेळी ग्रामस्थांना आवश्यक असलेली औषधे प्रदान करण्यात आली.