पालेभाज्यांचे दर वाढल्याने फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:40 AM2021-04-27T04:40:39+5:302021-04-27T04:40:39+5:30
वाढल्याने फटका फलटण : साताऱ्यातील बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. वांगी, वाटाणा, बटाटा, ...
वाढल्याने फटका
फलटण : साताऱ्यातील बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. वांगी, वाटाणा, बटाटा, कोबी, फ्लॉवर यांसह सर्वच पालेभाज्यांचे दर ४० ते ६० रुपये किलोवर गेले आहेत. टोमॅटो, मेथी, कोथिंबिरीचे दरही काही प्रमाणात वाढले आहेत. संचारबंदीमुळे भाजी विक्रेत्यांनी दरवाढ केल्याने याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.
सातारा शहराचा
पारा ३७ अंशावर
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उकाडा जाणवू लागला आहे. जिल्ह्याचे कमाल तापमानही दोन दिवसांपासून ३७ अंशांवर पोहोचले आहे. सोमवारी हवामान विभागाने शहराचे कमाल तापमान ३७.१, तर किमान तापमान २३.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. उकाडा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.
विक्रेत्यांकडून
प्लास्टिकचा वापर
सातारा : सातारा पालिकेने कारवाई करूनही शहरातील हातगाडीधारकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. शहरातील राजवाडा, खणआळी, मोती चौक, देवी चौक, पाचशे एक पाटी, जुना मोटर स्टँड परिसरातील अनेक हातगाडीधारक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू लागले आहेत. पालिकेची दंडात्मक मोहीम थंडाविल्याने परिस्थिती पुन्हा जैसे थे बनली आहे.
पसरणी घाटातील
कठड्यांची दुरवस्था
वाई : वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटातील संरक्षक कठड्यांची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. काही ठिकाणचे कठडे केवळ नावापुरतेच उरले आहेत. वाहतुकीसाठी हा घाट प्रशस्त असला तरी, बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्यादृष्टीने ठोस उपाययोजना करावी, धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर बसवावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.