वाढे फाटा ते पोवई नाका रस्त्याचे होणार चौपदरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:37+5:302021-05-18T04:40:37+5:30

सातारा सातारा-लोणंद या रस्त्यावरील वाढे फाटा ते पोवई नाका या ३.४० किलोमीटर रस्त्याचे भाग्य आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ...

The road from Wadhe Phata to Powai Naka will be quadrilateralized | वाढे फाटा ते पोवई नाका रस्त्याचे होणार चौपदरीकरण

वाढे फाटा ते पोवई नाका रस्त्याचे होणार चौपदरीकरण

Next

सातारा

सातारा-लोणंद या रस्त्यावरील वाढे फाटा ते पोवई नाका या ३.४० किलोमीटर रस्त्याचे भाग्य आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे उजळणार आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी तब्बल १४ कोटी ७२ लाख ३७ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

राज्य मार्ग ११७ असलेल्या शिक्रापूर, जेजुरी, लोणंद, सातारा या मार्गावरील सातारा शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाढे फाटा ते पोवई नाका या ३.४० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी या दुहेरी रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे, याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा मंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी मंत्री गडकरी यांनी त्यांच्या खात्यातून भरीव निधी मंजूर केला आहे.

मंजूर निधीतून वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याच्या चौपदरीकरणासह रस्त्याच्या कडेला आरसीसी गटार बांधणे, या रस्त्यावर असलेल्या पुलांची सुधारणा करणे, रस्त्याच्या मध्ये दुभाजक आदी कामाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार असून येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरु केले जाणार आहे. दुहेरी असलेल्या या प्रमुख रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर दळणवळणासाठी हा रस्ता अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

Web Title: The road from Wadhe Phata to Powai Naka will be quadrilateralized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.