माजी उपसरपंचाने स्वखर्चातून बनविला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:26 AM2021-07-20T04:26:07+5:302021-07-20T04:26:07+5:30
वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडी येथील पाटलूची वस्ती येथे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून खराब झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता. याची दखल ...
वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडी येथील पाटलूची वस्ती येथे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून खराब झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता. याची दखल घेऊन वरकुटे-मलवडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच डॉ. आनंदराव खरात यांनी स्वखर्चाने रस्ता दुरुस्ती करून वाहतुकीस सोयीस्कर केला आहे.
वरकुटे-मलवडीपासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाटलूची वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना संबंधित रस्त्याने दुचाकीवरून तसेच मोठ्या वाहनांसह पायी ये-जा करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. अनेकदा लोकांना खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे प्रवास करताना अपघातास सामोरे जावे लागत होते. जागोजागी रस्त्यातच मोठमोठे खड्डे असल्याने प्रवास करणे खूप जिकिरीचे बनले होते. याबाबत बऱ्याच वेळा नागरिकांनी अनेक नेत्यांजवळ याबाबत तक्रारी करूनही कोणीच त्याची दखल घेतली नाही. मात्र पाटलूच्या वस्तीत राहणाऱ्या काही लोकांनी माजी उपसरपंच डॉ. आनंदराव खरात यांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर त्यांनी कसलाही विलंब ना लावता तत्काळ जेसीबी व ट्रॅक्टर लावून तो रस्ता स्वखर्चातून दुरुस्त करून वाहतुकीसाठी सोयीस्कर करून दिल्याने, पाटलूची वस्ती ग्रामस्थांसह वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे.
फोटो : १९वरकुटे-मलवडी
वरकुटे-मलवडी येथील खराब झालेला रस्त्याची माजी सरपंचांनी स्वखर्चातून तयार केला. (छाया : सिद्धार्थ सरतापे)