चक्रीवादळात झाड पडल्याने रस्ते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:40 AM2021-05-19T04:40:46+5:302021-05-19T04:40:46+5:30

या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पाडेगाव येथे रस्त्यातच भले मोठे झाड उन्मळून पडले. सकाळच्या वेळीच हे झाड पडल्यामुळे अनेकांचा शेतात ...

Roads closed due to falling trees in cyclone | चक्रीवादळात झाड पडल्याने रस्ते बंद

चक्रीवादळात झाड पडल्याने रस्ते बंद

Next

या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पाडेगाव येथे रस्त्यातच भले मोठे झाड उन्मळून पडले. सकाळच्या वेळीच हे झाड पडल्यामुळे अनेकांचा शेतात जाताना तसेच दूध डेअरीला पाठवताना खोळंबा झाला. पाडेगावातील काही तरुणांनी कुऱ्हाडीच्या साहाय्याने एका बाजूने दुचाकी जाण्याइतपत रस्ता मोकळा केला. मात्र मोठी वाहने जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद आहे.

फलटण सार्वजनिक बांधकाम विभागाशी याबाबत वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही फोन उचलत नसल्याने नागरिकांच्या मनस्तापात वाढ होत आहे. झोपी गेलेले सार्वजनिक बांधकाम खाते कधी जागे होणार, असा सवाल सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे. नऊ ते दहा तास उलटूनही समस्या अजूनही ‘जैसे थे’ आहे. अजून किती वेळ रस्ता मोकळा व्हायला लागणार याचीच चिंता परिसरातील शेतकऱ्यांना पडली आहे. संध्याकाळी उशिरा सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यात पडलेले झाड हटवण्यासाठी काम सुरू केले. मात्र पाडेगावकरांना पूर्ण दिवस रस्त्या बंद असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

===Photopath===

180521\182-img-20210518-wa0023.jpg

===Caption===

पडलेले झाड

Web Title: Roads closed due to falling trees in cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.