दरोडेखोर म्हणे.. बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:18 AM2017-11-29T00:18:32+5:302017-11-29T00:19:30+5:30

The robber said .. I was leaving for Balmama's Darshan | दरोडेखोर म्हणे.. बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालोय

दरोडेखोर म्हणे.. बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालोय

Next


उंब्रज : उंब्रज येथे खून करून पाच ठिकाणी दरोडा टाकणाºया टोळीतील चौघांना उंब्रज पोलिसांनी तपासासाठी गावातून संबंधित घटनास्थळी चालत नेले. त्यामुळे दरोडेखोरांबद्दल असणारी दहशत लोकांमधून कमी होण्यास मदत झाली. तर दरोड्यातील आरोपी हे बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालोय म्हणून बाहेर पडले होते, अशी माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. दरम्यान, या चौघांना कºहाड न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील या टोळीने उंब्रज येथे एका वृद्धेचा खून करून पाच ठिकाणी दरोडा टाकला होता. दोन बंगल्यांतून दरोडेखोरांनी ३५ तोळे सोने लंपास केले होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चौघा जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. शशिकांत ऊर्फ काळ्या दत्तू ऊर्फ दप्तºया भोसले, अतुल दत्तू ऊर्फ दप्तºया भोसले, अरुण दशरथ चव्हाण, देवराम गुलाब घोगरे अशी त्यांची नावे आहेत.
या दरोडेखोरांच्या बाबतीतील नवनवीन माहिती आता तपासादरम्यान समोर येऊ लागली आहे. या दरोडेखोरांच्या टोळीत एका महिलेसह सहा जणांचा समावेश होता. संशयित बाळूमामाच्या दर्शनाला निघालोय, असे गावात सांगून या दरोड्यासाठी निघाले होते. संबंधितांनी प्रवासासाठी कारचा वापर केला होता. या कार चालकाने प्रवासात आपल्या पत्नीला सोबत घेतले होते. आरोपींनी सातारा तालुक्यातील नागठाणे येथील एका हॉटेलची खोली भाड्याने घेतली होती.
आरोपींना उंब्रज येथे सोडून चालक व त्याची पत्नी या लॉजवर थांबली होती. त्यानंतर आरोपींनी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास प्रभाकर जाधव यांच्या बंगल्यापासून दरोडा टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर राजीव रावळ यांच्या बंगल्यावर दरोडा घातला. या दोन्ही बंगल्यांत दरोडेखोरांच्या हाताला काहीच लागले नाही. यानंतर त्यांनी बाजारपेठेतील कन्या शाळेलगत असलेल्या अल्ताफ मुल्ला यांच्या बंगल्यावर दरोडा घातला. त्यावेळी संबंधित दरोडेखोर अल्ताफ व रियाज मुल्ला या दोन बंधूंच्या बंगल्याच्या मध्यभागातील जागेत गेले. त्यानंतर अल्ताफ मुल्ला यांच्या बंगल्याच्या पूर्व बाजूच्या खिडकीतून एकाने आत प्रवेश केला व त्याने पाठीमागील दार उघडले. तेथून इतर तीनजण आत गेले. बंगल्याच्या खोलील झोपलेल्या जैनुबी करीम मुल्ला (वय ८६) यांच्या बाजूला ते गेले. अंगावरील सोने काढताना त्यांना जाग आली. आरडाओरडा करू लागल्या म्हणून तोंडावर उशी दाबून त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर त्यांनी अंगावरील सर्व सोने काढले.
या प्रकारानंतर त्यांनी शेजारच्या रियाज मुल्ला यांच्या बंगल्याचा पाठीमागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला. परंतु रियाज मुल्ला यांनी आरडाओरडा केल्याने गेटमधून ते बाहेर पडले. यानंतर त्यांनी मोरकळ यांच्या बंगल्यावर आपला मोर्चा वळवला. तेथील महिला जागी असल्यामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला. त्यांनी कुंभार यांचा बंद बंगला फोडला. तेथील पाच तोळे सोने व रोख दहा हजार रुपये लंपास केले. यानंतर ते शिवडे गावाच्या हद्दीत गेले. पुणे-बेंगलोर महामार्गावरील इडली कामत या हॉटेलवर हल्लाबोल केला. तेथील सहा हजारांची रक्कम घेऊन ते महामार्ग ओलांडून पूर्वेकडे आले. यानंतर त्यांनी चालकाला फोन करून बोलावून घेतले. सर्वजण बाळूमामाच्या दर्शनाला कोल्हापूर बाजूकडे गेले. त्यानंतर दर्शन घेऊन ते निपाणीला गेले. उंब्रजमधील दरोड्याच्या पाचही ठिकाणी ही टोळी चालत गेलेली होती, असे तपासातून पुढे येत आहे.
दरोडेखोरांना दोन ठिकाणी अटकाव...
आरोपी संपूर्ण उंब्रज गावात दरोड्यासाठी फिरत होते. त्यावेळी त्यांना दोन ठिकाणी लोकांनी अटकाव केला होता. तो अटकाव कोणी केला होता. हे तपासात उघड होणे गरजेचे आहे. हत्यार बंद दरोडेखोरांना अटकाव करून त्यांना पिटाळून लावण्याचे धाडस करणाºया संबंधितांचा पोलिस व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करणे गरजेचे आहे. संबंधितांनी अटकाव केला नसता तर दरोडेखोरांकडून आणखी काही भीषण कृत्ये घडली असती, असेही सांगण्यात येत आहे.
मुलांना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण...
दरोडा प्रकरणातील चार आरोपींपैकी दोघेजण सख्खे भाऊ आहेत तर इतर दोघेजण मेहुणे आहेत. या आरोपींनी त्यांच्या गावात शेती पिकवली आहे. इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये मोठी फी भरून ते मुलांना शिकवत आहेत. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. तेव्हा एक आरोपी शेतात वांगी तोडत होता.

Web Title: The robber said .. I was leaving for Balmama's Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा