डोंगरावरून कोसळताहेत दगडगोटे, त्यातच तरुणांचे फोटोसेशन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:38 AM2021-07-31T04:38:19+5:302021-07-31T04:38:19+5:30

पेट्री : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात बहुतांश पर्यटक रस्त्याच्या मधोमध उभे राहून फोटोसेशन करत असतात. या भागात गेल्या काही ...

Rocks are falling from the mountain, including the photo session of the youth! | डोंगरावरून कोसळताहेत दगडगोटे, त्यातच तरुणांचे फोटोसेशन !

डोंगरावरून कोसळताहेत दगडगोटे, त्यातच तरुणांचे फोटोसेशन !

Next

पेट्री : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात बहुतांश पर्यटक रस्त्याच्या मधोमध उभे राहून फोटोसेशन करत असतात. या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे डोंगरातून दगडगोटे, माती पडत आहे. यामुळे अपघातांचा धोका संभवतो. त्यामुळे निष्काळजीपणातून फोटोसेशन करणे जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहराच्या पश्चिमेस कास तलाव, बामणोली, भांबवली धबधबा या जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर बहुतांश पर्यटक पर्यटनास येत आहेत. त्यांना यवतेश्वर घाटातूनच प्रवास करावा लागत असतो. शनिवार, रविवार सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर या मार्गावरून वाहनचालकांची, पर्यटकांची वर्दळ सुरू आहे. तसेच शेकडो वाहनांची सतत वर्दळ सुरू आहे. पर्यटनस्थळी भेट देत असताना जाता-येता हमखास पर्यटक यवतेश्वर घाटात थांबत असतात. घाटातील वानरसेनेचे बच्चेकंपनीला असणारे कुतूहल, मनाला शांती देणारा खळखळणारा झरा तसेच एका दृष्टिक्षेपात नयनरम्य दिसणारी सातारानगरी, या सर्व बाबींचे नेहमीच आकर्षण असणारे पर्यटक यवतेश्वर घाटात जाता-येता थांबतच असतात.

दरम्यान, घाटात थांबल्यानंतर बहुतांश पर्यटकांना फोटोसेशनचा मोह आवरत नसल्याने एखादा फोटो तसेच सेल्फीमध्ये एवढे तल्लीन होत आपण कधी रस्त्याच्या मधोमध आलो आहोत, याचे भान राहत नाही. मात्र, पावसाळ्यात कधी दरड, दगडगोटे निसटून रस्त्यावर येतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तरीही थांबणे धोक्याचे ठरू शकते. यामुळे पर्यटकांनी यवतेश्वर घाटात फोटोसेशन करताना सावधानता बाळगणे महत्त्वपूर्ण आहे.

कोट

स्टंट करता येईल, अशा अनेकविध ठिकाणी मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा तरुणाईचा कल जास्त आहे. यावेळी फोटोसेशन मोठ्या प्रमाणावर केले जाते. आपले पाल्य असुरक्षित ठिकाणी जाऊन फोटोसेशन करताना कोणताही धोका पत्करणार नाही, यासाठी पालकांनी लक्ष देऊन वेळोवेळी त्यांना सूचना करणे आवश्यक आहे.

- यशोदा पवार, पालक, सातारा

चौकट

निसरड्या कडा

या परिसरात सतत पाऊस पडत असल्याने कडा निसरड्या झाल्या असून, शेवाळ साठले आहे. अतिउत्साही तरुण रस्त्याच्या कडेला उभे राहून फोटो काढतात. मात्र, शेवाळांवरून पाय घसरल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. याचे भान या परिसरात येणाऱ्यांनी ठेवायला हवे.

फोटो ३०पेट्री-सेल्फी

यवतेश्वर घाटात वाहतुकीच्या मुख्य रस्त्याच्या मधोमध तरुणाई फोटोसेशन करून जीव धोक्यात घालत आहे.

(छाया : सागर चव्हाण) यवतेश्वर घाटात वाहतुकीच्या मुख्य रस्त्याच्या मधोमध तरुणाई फोटोसेशन करून जीव धोक्यात घालत आहे.

(छाया : सागर चव्हाण)

Web Title: Rocks are falling from the mountain, including the photo session of the youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.