रोहित पवारांना कॅल्क्युलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावं, फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:12 PM2020-08-29T14:12:03+5:302020-08-29T14:12:18+5:30

देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. त्यांनी नीट अभ्यास करून बोललं पाहिजे, असा टोला लगावला आहे. 

rohit Pawar does not understand calculations says devendra fadanvis | रोहित पवारांना कॅल्क्युलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावं, फडणवीसांचा टोला

रोहित पवारांना कॅल्क्युलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावं, फडणवीसांचा टोला

Next

सातारा: राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षातील आमदार असलेल्या रोहित पवारांवर हल्लाबोल केला आहे. भाजपानं घाईघाईत एलबीटी रद्द केल्यानं राज्याचं नुकसान झाल्याचं रोहित पवार  म्हणाले होते, त्याच विधानाचा देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला आहे. भाजपाची राज्यात सत्ता असताना त्यांनी एलबीटी घाईघाईत रद्द केला व त्यामुळे पाच वर्षांत २६ हजार कोटींचे नुकसान झाले. पण त्यांनी त्यासाठी कधीही केंद्राकडे पाठपुरावा केला नाही. हा पैसा जर आपल्या राज्य सरकारला मिळाला असता, तर आज आपल्याला आरोग्यापासून बऱ्याच गोष्टींसाठी खर्च करता आला असता, जीएसटीचे पैसे अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारकडे अडकल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. त्यांनी नीट अभ्यास करून बोललं पाहिजे, असा टोला लगावला आहे. 

कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी ते साताऱ्यात आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. जीएसटीचे जे कॅलक्युलेशन आहे ते बेसच्या वर १४ टक्के असं असते. पण आपणाला २०१७-१८ मध्येच बेसच्या वर जीएसटी मिळालेला आहे. म्हणून एलबीटी असता तरी हे पैसे मिळाले नसते. एलबीटीची मागणी आपण कौन्सिलसमोर ठेवली होती. पण ती मान्य केली गेली नाही. उगाच काहीतरी आकडे सांगायचे. एवढे मिळाले पाहिजे, तेवढे मिळाले पाहिजे, असं म्हणायचं. रोहित पवारांनी नीट अभ्यास केला पाहिजे आणि बोललं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले आहेत. 

केंद्र जीएसटीचे पैसे देत नाही अशी ओरड सातत्यानं केली जातेय. खोटं बोल पण रेटून बोल अशी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. खरंतर केंद्र सरकारने राज्यांना देणे असलेले मागील वर्षीचे म्हणजेच, मार्च २०२० पर्यंतचे १९,५०० रुपये आधीच दिले आहेत. साथ रोग कायद्याच्या नावाखाली केंद्र सरकार ते नाकारूही शकलं असतं. पण केंद्राने तसं केलेलं नाही. आताची जी मागणी होतेय, ती मार्चनंतरच्या जीएसटीची आहे. त्याबाबतही केंद्रानं मदतीची भूमिका घेतलीय,' असं फडणवीस म्हणाले. जीएसटी संबंधीच्या बैठकीत अजित पवार काय बोलले आणि त्यातून अर्थ काय काढले गेले यात फरक आहे. मी त्यासाठी अजितदादांना दोष देणार नसल्याचीही कोपरखळी फडणवीसांनी लगावली आहे. 
 

Web Title: rohit Pawar does not understand calculations says devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.