विकासात ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:38 AM2021-03-21T04:38:36+5:302021-03-21T04:38:36+5:30
उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील पालखी रोड ते बँक ऑफ महाराष्ट्र या महत्वाच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तसेच विद्यानगर येथील ...
उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील पालखी रोड ते बँक ऑफ महाराष्ट्र या महत्वाच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तसेच विद्यानगर येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरणास सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सह्याद्रीचे संचालक हंबीरराव पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष हेमंतराव जाधव, माजी पंचायत समिती सदस्य अॅड. प्रमोद पुजारी, सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. पालखी रोड ते बँक ऑफ महाराष्ट्र या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी नागरी सुविधा योजनेतून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर विद्यानगर येथील रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणासाठी नागरी सुविधांमधून पाच लाख व चौदाव्या वित्त आयोगातून पाच लाख असा दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली होती. हे रस्ते वर्दळीचे असूनही उखडले गेले होते. या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत जाधव, विजय जाधव, कृष्णात माळी, दिगंबर भिसे, विलास आटोळे, डॉ. दीपक माने, उत्तम कांबळे, विकास जाधव, विनायक जाधव, चंद्रकांत जाधव, राजन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : २०केआरडी०२
कॅप्शन : उंब्रज, ता. कऱ्हाड येथे रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, हंबीरराव पाटील, हेमंतराव जाधव, प्रमोद पुजारी, सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव आदी उपस्थित होते.