‘लोकमत’ची भूमिका ज्येष्ठांच्या मनामनात
By admin | Published: September 29, 2015 09:54 PM2015-09-29T21:54:13+5:302015-09-30T00:02:44+5:30
डॉल्बीमुक्ती : भुर्इंजकरांनी केला परिवाराचा गौरव
सातारा : ‘लोकमत’ने डॉल्बीमुक्ती चळवळ यशस्वी करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय दिला आहे. जिल्ह्यातील तमाम ज्येष्ठ नागरिकांच्या मनात ‘लोकमत’ची ही भूमिका कायमस्वरूपी कोरली गेली आहे, अशा शब्दांत भुर्इंजच्या अनेक नागरिकांना ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.‘आव्वाज गावाचा... नाय डॉल्बीचा’ ही मोहीम जिल्ह्यातील अनेक गावांत यशस्वी झाल्यानंतर साताऱ्यात ‘लोकमत’ परिवाराचे कौतुक करण्यासाठी शेकडो नागरिकांकडून समक्ष व फोनद्वारे संपर्क होत आहे. मंगळवारी सायंकाळी भुर्इंज येथील नागरिकांचे शिष्टमंडळ लोकमत कार्यालयात आले. त्यांनी सर्वप्रथम ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर भुर्इंजचे प्रतिनिधी राहुल तांबोळी यांना पुष्पगुच्छ देऊन ‘लोकमत’ परिवाराचा गौरव केला.
यावेळी सरपंच बाळासाहेब कांबळे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन रामदास जाधव, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव जगन्नाथ दगडे, ग्रामपंचायत सदस्य मदन शिंदे, प्रशांत जाधवराव, प्रकाश धुरगुडे, विनोद भोसले, रवी भोसले, चांदकचे माजी सरपंच
राजेंद्र संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाई तालुक्यातील भुर्इंजचे सरपंच बाळासाहेब कांबळे व इतर नागरिकांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन प्रतिनिधी राहुल तांबोळी यांचा सत्कार केला.