वैद्यकीय क्षेत्रातील परिचारिकांची भूमिका महत्त्वाची : अरुण पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:36 AM2021-05-15T04:36:51+5:302021-05-15T04:36:51+5:30
वाई : परिचारिका आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून निर्विकारपणे रुग्णांची सेवा करत असतात. औषधाबरोबर रुग्णांना मानसिक आधाराची गरज असते तो ...
वाई : परिचारिका आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून निर्विकारपणे रुग्णांची सेवा करत असतात. औषधाबरोबर रुग्णांना मानसिक आधाराची गरज असते तो आधार परिचारिका देत असतात याचा रुग्णांना फायदा होत असतो. जागतिक पातळीवर परिचारिकांच्या सेवेचे अनेक आदर्श आहेत. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत वाई तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण पवार यांनी व्यक्त केले.
परिचारिका दिनानिमित्त शहरातील परिचारिकांना कोरोना लढ्यात उपयोगी पडणारे सुरक्षा किट वाटप करण्यात आले, यावेळी ते बलत होते. यावेळी असोसिएशनचे सचिव विजयसिह कणसे, प्रशांत नागपूरकर व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
परिचारिका दिनानिमित्त, वाई तालुका केमिस्ट असोसिएशन यांनी वाई शहरातील सर्व कोविड केअर सेंटर हॉस्पिटलमधील १२१ परिचारिकांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वाई तालुका केमिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी संचालक यांनी परिश्रम घेतले.