वडोली निळेश्वर येथील शेतकऱ्यांच्या ग्रीन हाऊसचे छत उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:41 AM2021-05-18T04:41:37+5:302021-05-18T04:41:37+5:30
कोपर्डे हवेली : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने वडोली निळेश्वर येथील शेतकऱ्यांच्या दहा गुंठे क्षेत्रावरील ...
कोपर्डे हवेली : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने वडोली निळेश्वर येथील शेतकऱ्यांच्या दहा गुंठे क्षेत्रावरील ग्रीन हाऊसचे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी संजय पवार या शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने शेती करण्यासाठी १२ लाख ५० हजार रुपये खर्च करून ग्रीन हाऊस उभारले होते. गेल्या वर्षी वेगवेगळ्या फुलांचे उत्पादन घेतले; परंतु लाॅकडाऊनमुळे फुले विकता आली नव्हती. यंदा ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले. यावर्षीही लाॅकडाऊन असल्याने तीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामध्ये दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तसे रविवारी रात्री वादळ वाऱ्यासह पावसाने ग्रीन हाऊसचा कागद, नेट उडून गेले, तसेच आतील मिरचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित विभागाने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोट..
दोन वर्षांपूर्वी नवीन काय तरी करावे म्हणून १२ लाख ५० हजार रुपये खर्चून पाॅलीहास उभारले होते. दोनही वर्ष लाॅकडाऊन असल्याने फुले आणि ढोबळी मिरचीची विक्री करता आली नसल्याने तोटा झाला तर आता अवकाळी पावसामुळे ग्रीन हाऊसचे नुकसान झाले आहे.
- संजय पवार, शेतकरी वडोली निळेश्वर.
फोटो ओळ
वडोली निळेश्वर येथील शेतकरी संजय पवार यांच्या ग्रीन हाऊसचे पावसामुळे नुकसान झाले.
===Photopath===
170521\1944-img-20210517-wa0018.jpg
===Caption===
आ.अतुल सावे यांनी सी एस आर फंडातून सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय कोविड केअर सेंटरचे उदघाटन करतांना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस. सॊबत विजया रहाटकर, खा.डॉ.भागवत कराड, चंद्रशेखर बावनकुळे, अनिल मकरिये व इतर