कक्ष सुरू; पण उपकेंद्र कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:17+5:302021-06-11T04:26:17+5:30

मल्हारपेठ : बांधकाम पूर्ण होऊनही बंद असलेल्या उरुल (ता. पाटण) उपकेंद्रात विभागीय स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरु केला आहे. मात्र, ...

Room on; But when will the substation be? | कक्ष सुरू; पण उपकेंद्र कधी होणार?

कक्ष सुरू; पण उपकेंद्र कधी होणार?

Next

मल्हारपेठ : बांधकाम पूर्ण होऊनही बंद असलेल्या उरुल (ता. पाटण) उपकेंद्रात विभागीय स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरु केला आहे. मात्र, हे उपकेंद्र सुरु होण्यासाठी आणखी किती दिवस वाट पहावी लागणार, असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.

उरुल उपकेंद्रात उरुल, ठोमसे, बोडकेवाडी विभागातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरु केला आहे. ग्रामस्थांच्या मागणीमुळे प्रशासनासह ग्राम दक्षता समितीला जाग आली. मात्र, उपकेंद्र सुरु होण्याची चिन्हे कमीच आहेत. गत वर्षभरापासून कोरोना महामारीचे संकट आहे. आरोग्य यंत्रणाही तोकडी पडू लागल्यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. उरुल उपकेंद्राचे उद्घाटन होऊन दोन वर्ष झाली तरी केंद्रात आरोग्य सेवा मिळत नाही. कित्येकवेळा याबाबत माध्यमांमधून प्रशासनाला जाब विचारण्यात आला. मात्र, कर्मचारी नसल्याचे सांगण्यात आले. येथील पदे भरल्यानंतर उपकेंद्र सुरू करण्याचे आश्वासनही देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कसलीच कार्यवाही झाली नाही.

या उपकेंद्रात स्वतंत्र विलगीकरण कक्ष आणि लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केल्यानंतर आठच दिवसात तहसीलदार टोम्पे यांनी येथे विभागनिहाय विलगीकरण कक्षाची निर्मिती केली. याठिकाणी वीस बेडची सोय करण्यात आली आहे. त्याचा बाधितांची साखळी तोडण्यासाठी चांगला फायदा होणार आहे. आत्तापर्यंत या तीन गावांत शंभरपेक्षा जास्त बाधित आढळले असून, १० ते १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अजूनही या विभागातील रुग्णसंख्या कमी होत नसल्यामुळे तिन्ही गावाच्या दक्षता समिती व प्रशासनाच्या मदतीने विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

- कोट

घाणबी, वाटोळे उपकेंद्र सुरू झाल्यानंतरही या तालुक्यात राजकीय नेत्यांनी श्रेयवाद केला. मग उरुल उपकेंद्र सुरू करण्यासाठी श्रेयवाद कशात अडकला आहे, याचे उत्तर नेत्यांना का द्यावेसे वाटत नाही. तातडीने हे उपकेंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. हा विलगीकरण कक्ष अगोदरच सुरु केला असता तर विभागातील कोरोना रुग्णांची साखळी वाढली नसती.

- हर्षद देसाई

सामाजिक कार्यकर्ते - ठोमसे

फोटो : १० केआरडी ०४

कॅप्शन : उरुल (ता. पाटण) येथील उपकेंद्रात तहसीलदार योगेश टोम्पे यांच्या हस्ते स्वतंत्र विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. (छाया : सुनील साळुंखे)

Web Title: Room on; But when will the substation be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.