नितीन गडकरींकडे रोपवेचा प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:42 AM2021-09-26T04:42:34+5:302021-09-26T04:42:34+5:30

सातारा : अजिंक्यतारा किल्ला ते पायथा, सज्जनगड ते परळी पायथा व महाबळेश्वर ते प्रतापगड या तीन रोपवेच्या प्रकल्पांना भरघोस ...

Ropeway proposal submitted to Nitin Gadkari | नितीन गडकरींकडे रोपवेचा प्रस्ताव सादर

नितीन गडकरींकडे रोपवेचा प्रस्ताव सादर

Next

सातारा : अजिंक्यतारा किल्ला ते पायथा, सज्जनगड ते परळी पायथा व महाबळेश्वर ते प्रतापगड या तीन रोपवेच्या प्रकल्पांना भरघोस निधी द्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय भूपृष्ठ व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

गडकरी आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी कराड येथील जाहीर कार्यक्रमात उदयनराजेंच्या वतीने स्वीकृत नगरसेवक ॲड. दत्ता बनकर यांनी गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात उदयनराजे यांनी राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरण तसेच राज्य व जिल्हा महामार्ग मजबुतीकरण विकास कार्यक्रमांबद्दल गडकरी यांना धन्यवाद देऊन समाधान व्यक्त केले आहे. अजिंक्यतारा किल्ला ते पायथा, सज्जनगड ते परळी पायथा व महाबळेश्वर ते प्रतापगड या तीन मार्गिकांवर रोपवे बनविण्यासाठी भरघोस निधी देण्याची मागणी केली. राष्ट्रीय महामार्ग, केंद्रीय रस्ते निधी, पंतप्रधान सडक योजना इत्यादीच्या माध्यमातून महामार्ग डांबरीकरण, खंडाळ्याचा नवीन प्रस्तावित बोगदा, महामार्गावरील धोकादायक ठिकाणांचे नियमन, नवीन सहापदरीकरणाची कामे करण्यात यावीत. आजपर्यंत आम्ही केलेल्या मागण्यांना आपण सर्वोच्च प्राधान्याने निधी दिला. जिल्ह्यातील काही कामांचा लोकार्पण सोहळा होत आहे याचे प्रचंड समाधान उदयनराजे यांनी विशेषत्वाने व्यक्त केले आहे. जिल्ह्यात रोपवेच्या माध्यमातून पर्यटन व आर्थिक चक्राला गती देण्याचा प्रयत्न आहे.

रोपवेची संकल्पना खरोखर चांगली व उपयुक्त आहे. या योजनेची सुविधा उपलब्ध झाल्यावर दुर्गम भागातील दळणवळण सुलभ होणार आहे. आपण दिलेल्या प्रस्तावाला विनाविलंब मंजुरी व निधी दिला जाईल; याशिवाय सातारा शहराच्या हद्दीतील महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांना सीआरएफ अंतर्गत निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे प्रसिद्धिपत्रकात शेवटी नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Ropeway proposal submitted to Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.