विनामास्क फिरणाऱ्यांच्या हाती गुलाबपुष्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:38 AM2021-07-29T04:38:36+5:302021-07-29T04:38:36+5:30
जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाला असला तरी संक्रमण पूर्णपणे थांबलेले नाही. अद्यापही दररोज पाचशे ते हजार जण बाधित ...
जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाला असला तरी संक्रमण पूर्णपणे थांबलेले नाही. अद्यापही दररोज पाचशे ते हजार जण बाधित आढळून येत आहेत. प्रशासनाकडून वारंवार नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मात्र, त्याला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. अनेक जण विनामास्क फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे कालेटेक येथील पोलीस पाटील विठ्ठल जाधव व महेश जाधव यांनी गांधीगिरी करीत अनोखी मोहीम राबविली. कऱ्हाड-उंडाळे मार्गावर थांबून त्यांनी विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांना अडवले. त्यांना मास्क व गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी केली. अनेक वाहनधारक वाहनातून प्रवास करताना मास्कचा वापर करीत नाहीत. त्यामुळे त्यांना मास्कची गरज समजावून देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे विठ्ठल जाधव व महेश जाधव यांनी सांगितले.
फोटो : २२केआरडी०८
कॅप्शन : कऱ्हाड-उंडाळे मार्गावर कालेटेक येथे वाहने अडवून वाहनधारकांना मास्क व गुलाबपुष्प देण्यात आले.