‘रोटरी क्लब’चा पूरग्रस्तांना हात : राजपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:47 AM2021-09-08T04:47:11+5:302021-09-08T04:47:11+5:30
सातारा : रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत केलेली मदत हे आदर्शवत काम असून, विधायक कामासाठी क्लब नेहमीच अग्रेसर असतो, ...
सातारा : रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत केलेली मदत हे आदर्शवत काम असून, विधायक कामासाठी क्लब नेहमीच अग्रेसर असतो, असे मत जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ मुंबई व्हिजनरीज यांच्यावतीने महाबळेश्वर तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. रोटरीच्या अध्यक्षा वैशाली काळे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
स्टोव्हसह राशन, गव्हाचा आटा, तेल, मोहरी, हळद, मीठ, प्लेट्स, तसेच चादरी, चटई, एलईडी, महिलांसाठी साड्या, तर लहान मुलांसाठी कपडे, वह्या, पेन, आदी जीवनावश्यक साहित्याचे कीट तयार करून महाबळेश्वर तालुक्यामधील घावरी व मालुसर या गावातील बाधितांना वाटप करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
रोटरी क्लब ऑफ मुंबई व्हिजनरीज यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील पाटण, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या गावातील लोकांना तांदूळ, तूरडाळ, मिनरल वाटर, मेणबत्ती, बेड्शीट, चटई, टॉवेल, सॅनिटरी पॅड, टूथपेस्ट, साबण, डेटॉल, डीडीटी पावडर, आदी जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करून वितरित केलेले आहे. याव्यतिरिक्त मुंबई पोलिसांसाठी रेनकोटस आणि कस्तुरबा हॉस्पिटल, परेल येथील अपंगांसाठी व्हीलचेअरचेदेखील वितरण केलेले आहे.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, रोटरी क्लब ऑफ मुंबई व्हिजनरीजचे सेक्रेटरी तारीखभाई, क्लब मेंबर शुभम कदम, राकेश शेटे, अनिकेत पवार, वैभव ठाकर, सुनील जाधव, प्रवीण भिलारे, श्रीधर भाडलकर, कल्पना शिंदे, आदींनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना मदत केली.
फोटो नेम : ०४डीसीसी
फोटो ओळ : महाबळेश्वर येथे आपत्तीग्रस्तांना रोटरी क्लबतर्फे मदत देण्यात आली.