रोटरीच्या अन्नछत्र सेवा योजनेचा शुभारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:37 AM2021-05-15T04:37:18+5:302021-05-15T04:37:18+5:30

रोटरी क्लब ऑफ कराड या सामाजिक संघटनेने कराड शहरामध्ये ६५ वर्षांहून अधिक कालापासून शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यावरण, स्वच्छता, आर्थिक आणि ...

Rotary's food umbrella service scheme launched! | रोटरीच्या अन्नछत्र सेवा योजनेचा शुभारंभ !

रोटरीच्या अन्नछत्र सेवा योजनेचा शुभारंभ !

Next

रोटरी क्लब ऑफ कराड या सामाजिक संघटनेने कराड शहरामध्ये ६५ वर्षांहून अधिक कालापासून शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यावरण, स्वच्छता, आर्थिक आणि सामुदायिक विकास, माता आणि मुलांचे आरोग्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये निरंतर विविध उपक्रम राबवून, आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात गरजू व गरीब असेच रुग्ण येत असतात. यामध्ये बहुतांश रुग्ण हे बाहेर गावचे असून, त्यांच्यासोबत त्यांचा नातेवाईक ही असतो. रुग्णालयामधील सर्व रुग्णांना हॉस्पिटलच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे. पण रुग्णांच्या सोबत आलेल्या नातेवाईकाच्या जेवणाची सोय ज्याने त्यानेच करण्याची आहे.

सध्या कोविडची परिस्थिती अत्यंत गंभीर असून, कोविड पेशंटच्या नातेवाइकांना रुग्णालयात थांबून घेतले जात नाही. पण नॉन-कोविड रुग्णांच्या नातेवाइकांची आजच्या परिस्थितीमध्ये प्रचंड फरपट होते आणि त्यांना किमान जेवणासारख्या विषयाकरिता झगडावे लागते. याच समस्येवर उत्तर देण्याच्या उद्देशाने रोटरी अन्नछत्र सेवा ही योजना सुरू करण्यात आली आहे.

सदरचा उपक्रम सध्याच्या लॉकडाऊन किंवा कोविड पुरता मर्यादित न ठेवता तो अखंड व कायमस्वरूपी चालवण्याचा रोटरीचा प्रयत्न आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ करडच्या वतीने देण्यात आली. या उपक्रमाकरिता लागणाऱ्या निधीकरिता रोटरीच्या सर्व सदस्यांनी स्वतः आणि आपल्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने मदत जमा करण्याचे कार्य सुरू केले आहे.

दरम्यान, रोटरी अन्नछत्र सेवा कार्याच्या शुभारंभप्रसंगी गरजूंना जेवणाचे पॅकेट मंत्री बाळासाहेब पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, डॉ. प्रकाश शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

फोटो

कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारील पाणी टाकीचे लोकार्पण करताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील व इतर

Web Title: Rotary's food umbrella service scheme launched!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.