अडथळे ठरणाऱ्या २३७ विद्युत खांबांचा फेर सर्व्हे : सातारा वाहतूक सुरळीतसाठी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:47 PM2018-02-20T19:47:46+5:302018-02-20T19:49:50+5:30
सातारा : शहर वाहतुकीस अडथळा ठरणाºया तब्बल २३७ विद्युत खांबांचा फेर सर्व्हे करण्यात येणार असून,
सातारा : शहर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या तब्बल २३७ विद्युत खांबांचा फेर सर्व्हे करण्यात येणार असून, हा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर अडथळे ठरणारे विद्युत खांब अन्य ठिकाणी हलविण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून साताऱ्यातील विद्युत खांबांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या खांबांमुळे वाहतुकीस अडथळा तर होतोच; शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे रस्त्यात अडथळा ठरणारे पोल बाजूला करण्याची मोहीम वीज विरतण कंपनीने हाती घेतली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी वीज वितरणला रस्त्यात अडथळे ठरणारे पोल काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर काहीच हालचाली झाल्या नाहीत.
परंतु अलीकडे शहराचा विस्तार झाल्याने हे अडथळा ठरणारे खांब हटविण्याची नितांत गरज बनली आहे. त्यामुळे वीज विरतणच्या अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि परिसरात अडथळे ठरणाºया पोलचे सर्व्हे सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी ज्यावेळी सर्व्हे करण्यात आला. त्यावेळी तब्बल २३७ पोल रस्त्यात अडथळा ठरत असल्याचे पुढे आले होते. मात्र, त्यानंतर अनेक ठिकाणी घरे, इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे आणखीनच अशा पोलचा अडथळा नागरिकांना आणि वाहनांना होत आहे.
पावसाळ्यात विद्युत पोलीमधून प्रवाह उतरून दुर्घटना घडू नये म्हणून यंदा वीज वितरणने खबरदारी घेतली आहे. या नव्या सर्व्हेमध्ये २३७ पेक्षा जास्त पोल अडथळे ठरण्याची शक्यता वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.